नेपाळमध्ये भीषण रस्ता अपघात! खोल दरीत कोसळली जीप कोसळल्याने ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nepal Road Accident News Marathi : काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) एक भयंकर रस्ता अपघाताची (Road Accident) घटना घडली आहे. एक जीप शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) रात्री कर्नाली प्रांतात दरीत कोसळली आहे. या घटनेने संपूर्ण नेपाळमध्ये खळबळ उडाली आहे. असा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एक जीप १८ प्रवाशांना घेऊन नेपाळच्या मुसीकोट येथील खलंगा बाजार मार्गावरुन बिस्कॉटच्या स्यालीखारीकडे निघाली होती. यावेळी जीप अचानक ७०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात आठ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे, तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला आहे.
या घटनेची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथक घटनास्थळी दाखली झाले. परंतु अत्यंत कठीण भूभागामुळे लोकांना वाचवण्या अडथशळा येते होते. परंतु १० जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांना प्राथमिक तपासात आढळून आले की, जीपचा वेग जास्त असल्याने हा अपघात घडला. अपघात घडल्याच्या ठिकाणचा रत्सा हा अगदी वळणदार आहे. यामुळे चालकाचा जीवपरील ताबा सुटाला आणि जीप थेट खोल दरीत कोसळली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. एका जखमीला रुग्णालयात नेण्यात आले, पण तो तिथे पोहचताच मरण पावला. मृतांमध्ये १५ ते ३० वयोगटातील तरुणांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने नेपाळमध्ये शोककळा पसरली आहे. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, पण काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
नेपाळमध्ये गेल्या काही वर्षात सतत रस्ते अपघाताच्या घटना घडत आहे. यामुळे रस्ते सुरक्षा ही एक गंभीर समस्या बनली आहे. गेल्या वर्षा असे डझनभर अपघात घडले आहे, ज्यामध्ये शेकडो लोकांचा बळी गेला आहे. सध्या या घटनेवर नेपाळच्या सरकाने शोक व्यक्त केला आहे. नेपाळ सरकारने अपघातात मरण पावलेल्या पीडीतांच्या कुटुंबियाप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतही जाहीर केली आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. नेपाळमध्ये कुठे घडला रस्ता अपघात?
नेपाळच्या कर्नाली प्रांतात एक जीप मुसीकोट येथील खलंगा बाजार मार्गावरुन बिस्कॉटच्या स्यालीखारीकडे जात होती, यावेळी भीषण रस्ता अपघात घडला आहे.
प्रश्न २. नेपाळच्या रस्ता अपघातात किती जीवितहानी झाली?
नेपाळच्या रस्ता अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण गंभीर जखमी झाले आहे.
प्रश्न ३. रस्ता अपघातावर नेपाळ सरकारने काय प्रतिक्रिया दिली आहे?
नेपाळ सरकारने अपघातात मरण पावलेल्या पीडीतांच्या कुटुंबियाप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतही जाहीर केली आहे.
नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांच्याकडून भारताचे कौतुक ; PM मोदींकडे केली ‘ही’ खास मागणी






