Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-कॅनडा संबंध पुन्हा होताहेत दृढ; जयशंकर यांनी घेतली अनिता आनंद यांची भेट घेतली

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. दिल्ली आणि ओटावाच्या माध्यमातून उच्चायुक्तांच्या नियुक्तीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 30, 2025 | 07:23 AM
भारत-कॅनडा संबंध पुन्हा होताहेत दृढ; जयशंकर यांनी घेतली अनिता आनंद यांची भेट घेतली

भारत-कॅनडा संबंध पुन्हा होताहेत दृढ; जयशंकर यांनी घेतली अनिता आनंद यांची भेट घेतली

Follow Us
Close
Follow Us:

ओट्टावा : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. दिल्ली आणि ओटावाच्या माध्यमातून उच्चायुक्तांच्या नियुक्तीला दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी एक स्वागतयोग्य पाऊल म्हणून वर्णन केले.

जयशंकर यांनी ‘एक्स’वर याबाबत पोस्ट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी ‘न्यूयॉर्कमध्ये कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्याशी चांगली बैठक झाली. दोन्ही देशांतील संबंध पुन्हा निर्माण करताना उच्चायुक्तांच्या नियुक्तीचे स्वागत आहे. या संदर्भात आम्ही पुढील पावलांवर चर्चा केली. मंत्री अनिता आनंद यांचे भारतात स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत’. ऑगस्टमध्ये, भारताने दिनेश पटनायक यांची कॅनडामधील भारताच्या पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती जाहीर केली. गेल्या आठवड्यात पटनायक यांनी कॅनडाच्या गव्हर्नर जनरल मेरी सायमन यांना त्यांची पत्रे सादर केली. त्यानंतर आता ते त्यांच्या पदभार स्वीकारताना दिसत आहे.

हेदेखील वाचा : भारत-कॅनडा संबंधावर खलिस्तानी नाराज? व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी

दरम्यान, गेल्या महिन्यात, भारत आणि कॅनडाने एकमेकांच्या राजधानींमध्ये उच्चायुक्तांची नियुक्ती केली. ताणलेल्या संबंधांनंतर भारताने गेल्या वर्षी आपले उच्चायुक्त परत बोलावले होते. त्यानंतर भारतानेही कॅनेडियन राजदूतांनाही देशाबाहेर काढले होते. मात्र, या दोन्ही देशांतील संबंध सुधारताना दिसत आहे. त्यानुसार, आता वरिष्ठ पातळीवर भेटी घेतल्या जात आहे.

भारत-कॅनडातील संबंध तणावात

भारत आणि कॅनडाचे संबंध गेल्या काही काळात ताणले गेले होते. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिनी ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी खलिस्तान चवळीबाबत त्यांनी भारतविरोधी आक्रमक भूमिका स्वीकारली होती. यामुळे दोन्ही देशांत संबंधांमध्ये बिघाड झाला होता.

नव्या पंतप्रधानांची भूमिका सकारात्मक

कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारतासोबत मैत्री सुधारण्याची भूमिका स्वीकारली आहे. मात्र, यामुळे कॅनडातील खलिस्तानी नाराज झाल्याचे दिसून येत आहे. कट्टर खलिस्तानी समर्थक संस्था शीख फॉर जस्टिस (SFJ) ने भारताविरोधात युद्ध पुकारले आहे. त्यांनी व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे.

Web Title: India canada relations are getting stronger again s jaishankar meets anita anand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 07:13 AM

Topics:  

  • S. Jaishankar

संबंधित बातम्या

एस. जयशंकर यांनी घेतली मार्को रुबियो यांची भेट; दिल्ली बॉम्बस्फोटावर दोन्ही मंत्र्यांमध्ये झाली चर्चा, जाणून घ्या
1

एस. जयशंकर यांनी घेतली मार्को रुबियो यांची भेट; दिल्ली बॉम्बस्फोटावर दोन्ही मंत्र्यांमध्ये झाली चर्चा, जाणून घ्या

G-7 दरम्यान फ्रान्ससह ‘या’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची घेतली जयशंकर यांनी भेट; जाणून घ्या काय चर्चा झाली?
2

G-7 दरम्यान फ्रान्ससह ‘या’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची घेतली जयशंकर यांनी भेट; जाणून घ्या काय चर्चा झाली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.