भारत-कॅनडा संबंधावर खलिस्तानी नाराज? व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पण कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारतासोबत मैत्री सुधारण्याची भूमिका स्वीकारली आहे. मात्र यामुळे कॅनडातील खलिस्तानी नाराज झाल्याचे दिसून येत आहे. कट्टर खलिस्तानी समर्थक संस्था शीख फॉर जस्टिस (SFJ) ने भारताविरोधात युद्ध पुकारले आहे. त्यांनी व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे.
‘दिल्ली-मुंबई हल्ल्यांमागे मसूद अजहरचा हात’ ; जैशचा दहशतवाद्याने उगळले सत्य
सध्या कॅनडा आणि भारताचे संबंध हळूहळू सुधारत आहे, अशा परिस्थिती खलिस्तानी समर्थकांनी पुन्हा एकदा भारताला धमकवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कॅनडाच्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुार, SFJ ने व्हॅंकुव्हरमध्ये बारती दूतावासाला घेराव घातला आहे. तसेच १८ सप्टेंबर रोजी दूतावास ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, भारतीय किंवा कॅनेडियन नागरिकांनी दूतासाच्या आसपास जाऊ नये.
या संदर्भाकत SFJ ने एक पोस्टर जारी केला आहे. या पोस्टरमध्ये कॅनडातील भारतीय उच्चायुक्त दिनेश पटनायक यांचा फोटो असून त्यांनाा बंदुकीने लक्ष्य केले असल्याचे दाखवण्यात आले आहे. SFJ संघटनेने एक प्रचार पत्र जारी केले आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येची सध्या चौकशी सुरु आहे. पण यामध्ये भारतीय दूतावास खलिस्तान जनमत चाचण्यांमध्ये हेरगिरी करत आहे.
यामुळे त्यांच्या खलिस्तानी चवळींवर परिणाम होत आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दावा केला होता की, २०२३ मध्ये झालेल्या निज्जरच्या हत्येत भारताचा हात आहे. तेव्हापासून खलिस्तनींनी भारतीयांविरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान अद्याप कॅनडाच्या सरकराकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची 18 जून 2023 रोजी कॅनडातील सरे येथे एका गुरुद्वाराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली. भारतात वॉन्टेड असलेल्या निज्जरवर 12 पेक्षा जास्त हत्या आणि दहशतवादी कृत्यांशी संबंधित गुन्हे दाखल होते. 1997 मध्ये तो कॅनडात पळून गेला. त्यानंतरही कॅनडा सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही. या हत्येनंतर भारत-कॅनडा संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.
FAQs(संबंधित प्रश्न)
भारत आणि कॅनडातील संबंध का बिघडले होते?
खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर यांची २०२३ मध्ये हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येचा आरोप कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिनी ट्रुडो यांनी भारतावर केला होता. यामुळे भारत कॅनडा संबंध ताणले गेले.
खलिस्तानी समर्थकांनी भारताला काय धमकी दिली?
खलिस्तानी समर्थकांनी भारताला कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे.
‘आम्हाला गुन्हेगारासारखे…’ ; जॉर्जियात भारतीय पर्यटकांसोबत गैरवर्तन, महिला ट्रॅव्हलरचा खळबळजनक दावा






