Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-China border Dispute: भारत-चीन वाद मिटवण्यासाठी मदत करू…; अमेरिकेच्या ऑफरवर भारताचे थेट प्रत्युत्तर

अमेरिका दरवर्षी 900 अब्ज डॉलर संरक्षणावर खर्च करतो, तर चीन 450 अब्ज डॉलर खर्च करतो. हा पैसा परस्परांशी संघर्ष करण्यासाठी वापरण्याऐवजी चांगल्या उद्देशांसाठी वापरायला हवा.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 14, 2025 | 04:44 PM
India-China border Dispute: भारत-चीन वाद मिटवण्यासाठी मदत करू…; अमेरिकेच्या ऑफरवर भारताचे थेट प्रत्युत्तर
Follow Us
Follow Us:

India-China border Dispute: भारतीय वेळेनुसार गुरुवारी संध्याकाळी (शुक्रवारी पहाटे 5 वाजता) अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी ट्रम्प यांनी भारत-चीन सीमेवरील तणाव मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष क्रूर आहे. जर मी हे थांबवण्यासाठी काही मदत करू शकलो, तर मला आनंद होईल.”

भारताचे थेट उत्तर 
भारताने ट्रम्प यांच्या या प्रस्तावाला विनम्र पण ठाम नकार दिला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, “भारत आपल्या कोणत्याही शेजारी देशासोबतचे प्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडवतो. भारत-चीन सीमेचा मुद्दाही आम्ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय सोडवण्यास प्राधान्य देतो.”

US Deportation: अमेरिकेतून पुन्हा भारतीयांना केले हद्दपार; ट्रम्प प्रशासनाची कारवाई सुरूच

ट्रम्प यांनी चीनबद्दल काय म्हटले?

चीनशी संबंधित प्रश्नावर ट्रम्प यांनी म्हटले की, “चीनसोबत आमचे संबंध चांगले राहतील. कोविडच्या आधीपर्यंत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि माझ्यात चांगले संबंध होते. चीन हा जागतिक स्तरावर महत्त्वाचा खेळाडू आहे. तसेच, मला वाटते की चीन रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी मदत करू शकतो.”

संरक्षण खर्च आणि जागतिक सहकार्याचा मुद्दा:

ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, “अमेरिका दरवर्षी 900 अब्ज डॉलर संरक्षणावर खर्च करतो, तर चीन 450 अब्ज डॉलर खर्च करतो. हा पैसा परस्परांशी संघर्ष करण्यासाठी वापरण्याऐवजी चांगल्या उद्देशांसाठी वापरायला हवा.”

Valentine Day: प्रेमाचा खरा अर्थ, सिनेमाच्या कथेला लाजवेल अशी विभूती-नितीका ढौंडियाल यांची Love Story

भारताचा नेहमीच ठाम दृष्टिकोन:

भारताने यापूर्वीही कधीही कोणत्याही तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाला संमती दिली नाही. विशेषतः चीन, पाकिस्तान किंवा इतर शेजारी देशांसोबतच्या तणावाच्या बाबतीत भारताने स्वत:च्या धोरणानुसार द्विपक्षीय चर्चा आणि राजनैतिक मार्गानेच प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला असला तरी, भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने स्वतंत्र आणि सक्षम राष्ट्र म्हणून कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाशिवाय प्रश्न सोडवण्याचे धोरण कायम ठेवले आहे.

Web Title: India china border dispute donald trumps new offer to resolve india china dispute india said nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 04:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.