'भारताने २० नव्हे तर २८ क्षेत्रे उद्ध्वस्त केली', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची मोठी कबुली (फोटो सौजन्य-X)
Operation Sindoor News in Marathi: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने या भ्याड हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे आधीच स्पष्ट केलं होतं. 7 मे मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठीकाणांवर हल्ला केला. या ऑपरेशन अंतर्गत एकूण 9 दहशतवादी ठीकाणांवर हल्ला केला गेला. ही कारवाई योग्य रणनितीनुसार पार पडली. या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हतं, पण दहशतवादी ठीकाणांवर वेचून हल्ला केला आहे. भारताने दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली आहे. मात्र आता पाकिस्तानच्या कागदपत्रात ऑपरेशन सिंदूरबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारतीय सैन्याने सांगितलेल्यापेक्षा पाकिस्तानचे जास्त नुकसान झाले आहे असा दावा पाकिस्तानमधून करण्यात येत आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने फक्त दहशतवादी अड्डे लक्ष्य केले होते. परंतु त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने आघाडी उघडली. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय सैन्याने तो हाणून पाडला. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या लष्करी तळांना मोठे नुकसान झाले.
ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानने अनेक वेळा खोटे बोलले आहे. परंतु त्यांच्या कागदपत्रांनी हे खोटे उघड केले आहे. पाकिस्तानच्या कागदपत्रांमध्ये असे दिसून आले आहे की भारताने आत खोलवर प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी पाकिस्तानमध्ये २० नव्हे तर २८ ठिकाणी हल्ले केले होते. भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत पाकिस्तानमध्ये प्रत्युत्तर देण्यात आलेल्या ठिकाणांचा उल्लेख केला नाही. परंतु कागदपत्रांमध्ये हे देखील उघड झाले आहे. पेशावर, सिंध, झांग, गुजरांवाला, भावलनगर आणि चोरसह अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.
भारताने पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य केले होते. त्यांनी नूर खान, रफीकी, मुरीदके, सुकरूर, सियालकोट, पसरूर, चुनियान आणि सरगोधा यासह एकूण ११ हवाई तळांवर प्रत्युत्तर दिले होते. अलीकडेच मॅक्सर टेक्नॉलॉजीजने उपग्रह प्रतिमा जारी केल्या होत्या. याद्वारे, ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या लष्करी तळांना झालेले नुकसान उघड झाले.
भारताने बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षण केंद्रासह नऊ ठिकाणी कारवाई केली होती. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. या दरम्यान १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्याच वेळी, पाक सैन्याच्या प्रवेशानंतर या ऑपरेशनने मोठे स्वरूप धारण केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी पायाभूत सुविधांवर अचूक हल्ले केले, त्यानंतर पाकिस्तानने ८, ९ आणि १० मे रोजी भारतीय लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय बाजूने पाकिस्तानी हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देऊन विमानतळ, हवाई संरक्षण प्रणाली, कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि रडार साइट्ससह अनेक प्रमुख पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांचे मोठे नुकसान केले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी १० मे रोजी घोषणा केली की, भारत आणि पाकिस्तानने जमीन, हवाई आणि समुद्रावरील सर्व प्रकारच्या लष्करी कारवाया थांबवण्यास सहमती दर्शविली आहे.