इस्लामाबाद: भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेजवळ (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोन व क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ८ आणि ९ मे रोजी पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि काही क्षेपणास्त्र भारताच्या दिशेने डागले होते. मात्र, भारतीय लष्कराने तत्काळ काऊंटर ड्रोन ऑपरेशन सुरू करत पाकिस्तानचे ५० हून अधिक ड्रोन हवेतच निष्प्रभ केले. या कारवाईत भारतीय वायूदलानेही सक्रिय सहभाग घेतला. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोटसह अनेक भागांमध्ये ड्रोन आकाशातच पाडण्यात आले. क्षेपणास्त्रांनाही लष्कराच्या हवाई संरक्षण प्रणालीने लक्ष्य करत हवेतच नष्ट केले. या हल्ल्यांनंतर काही भागांत आकाशात धूराचे लोट दिसून आले. गुरूवारी (8 मे) देखील पाकिस्तानकडून जोरदार हल्ले करण्यात आले. पण पाकिस्तानचे हे हल्ले परतून लावत भारतीय लष्कराने जशास तसे उत्तर दिले.
भारतीय सैन्याच्या या प्रतिहल्ल्यामुळे पाकिस्तानात घबराटीचे वातावरण पसरले आहेत. धक्कादायक म्हणजे आता पाकिस्तानी खासदारही तेथील राष्ट्राध्यक्ष शाहबाज शरीफ यांच्या विरोधात गेल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या संसदेच्या अधिवेशनात पीटीआय खासदाराने पाकिस्तानच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना गिधाडाची उपमा दिली आहे.
आता उपाशी मारणार? IMF पाकिस्तानला निधी देणार की नाही? आज होणार फैसला
खासदार म्हणाले की, भारतासोबत झालेल्या तणावाबाबत आमच्या सरकारकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. आमच्या देशाच्या नेत्यासाठी मला टिपू सुलतानचे एक वाक्य आठवते, “जर सैन्याचा नेता सिंह असेल आणि त्याचे सैनिक गिधाडे असतील, तर ते देखील सिंहासारखे लढतात आणि युद्ध जिंकतात. पण जर सैन्याचा नेताच गिधाड असेल आणि त्याचे सैनिक सिंह असतील तर सिंह देखील युद्ध हरतात.”
ते पुढे म्हणाले की, देशातील जनतेला त्यांच्या नेत्याकडून अपेक्षा असतात, पण जेव्हा तुमचा नेताच भित्रा असतो आणि तो पाकिस्तानचे नावही घेऊ शकत नाही, तेव्हा तो सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना काय संदेश देईल. इतकेच नव्हे तर, पाकिस्तानचे सर्वोच्च नेतृत्व भारतीय पंतप्रधानांना घाबरतात आणि ते त्यांचे नाव घेण्यासही कचरतात, अशी जहरी टीकाही पाकिस्तानी खासदाराने यावेळी केली.
ड्रायव्हरच्या लग्नात कुटुंबासोबत सहभागी झाली नेहा कक्कर; वधू- वराला दिले ‘हे’ खास गिफ्ट, Video Viral
दुसरीकडे, पहलगाम हल्ल्यानंतर,२६ लोकांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त शिक्षा मिळेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर ७ मे रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि सुमारे १०० पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले. भारताच्या या कारवाईनंतर, पाकिस्तानने भारतातील अनेक भागात हल्ला केला, जो भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडला. या हल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय स्तरावर, दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.