Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत रशियाला मोठा धक्का देणार? ‘या’ आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी

याबाबत एक व्यापक योजना आखली जात आहे. रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यानंतर कोणते पर्याय शिल्लक आहेत ते केंद्र सरकार पाहत आहे. आपण इतर कोणत्या देशांकडून तेल खरेदी करू शकतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 17, 2025 | 12:32 PM
भारत रशियाला मोठा धक्का देणार? 'या' आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी

भारत रशियाला मोठा धक्का देणार? 'या' आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली / संतोष ठाकूर : भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करतो. यातून मिळणारा पैसा रशिया युक्रेन युद्धात वापरत आहे, असा आरोप करत अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादला आहे. यानंतर आता भारताने एक मोठा निर्णय घेत येत्या काळात रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत एक व्यापक योजना आखली जात आहे. रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यानंतर कोणते पर्याय शिल्लक आहेत ते केंद्र सरकार पाहत आहे. आपण इतर कोणत्या देशांकडून तेल खरेदी करू शकतो. या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या रशियाकडून तेल खरेदीत कोणतीही कपात केलेली नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाकडून तेल कमी केल्याने भारतावर कोणताही मोठा आर्थिक परिणाम होणार नाही.

हेदेखील वाचा : Russia Ukraine War : झेलेन्स्कींना झटका! ट्रम्प-पुतिन बैठीदरम्यान रशियन सैन्याचा युक्रेनच्या दोन भागांवर ताबा

याचे कारण असे की, सध्या रशियाकडून खरेदी केले जाणारे तेल जगातील इतर देशांपेक्षा फक्त २-२.५ डॉलर्स स्वस्त आहे. इतकेच नाही तर भारताचा रशियासोबत कोणताही दीर्घकालीन खरेदी करार नाही. ही खरेदी अल्पकालीन किंवा स्पॉट खरेदीवर आधारित आहे.

इतर पर्यायांचा शोध

तज्ज्ञाच्या मते, भारताने अमेरिकेला सांगितले की रशियाकडून तेल खरेदी कमी करायची असेल तर त्याने भारताला पर्याय सांगावा. सध्या भारत अमेरिकेकडून एलएनजी आणि तेल खरेदी करतो. अमेरिका स्वस्त दरात तेल पुरवत असेल तर आपण अमेरिकेकडून तेल खरेदी करू शकतो.

रशिया-युक्रेनमध्ये युद्ध अद्याप सुरू

रशिया-युक्रेनमध्ये युद्ध अद्याप सुरू आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने युक्रेनच्या डोनेस्टक भागातील कोलोडियाजी आणि निप्रोपेट्रोव्स्कमधील वोरोन गावावर नियंत्रण मिळवले आहे. याचवेळी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी, रशियाने युक्रेनवर ८५ ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली असल्याचे म्हटले आहे. हा हल्ला आणि ताबा रशिया युक्रेन युद्धबंदीच्या शांतता करारासाठी अत्यंत धोकादायक मानला जात आहे.

Web Title: India will give a big blow to russia by reducing oil purchases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • international news

संबंधित बातम्या

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह
1

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?
2

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

म्यानमार गृहयुद्ध भीषण वळणावर; लढाऊ विमानांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी
3

म्यानमार गृहयुद्ध भीषण वळणावर; लढाऊ विमानांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक
4

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.