Russia Ukraine War : झेलेन्स्कींना झटका! ट्रम्प-पुतिन बैठीदरम्यान रशियन सैन्याचा युक्रेनच्या दोन भागांवर ताबा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine War news in Marathi : कीव : रशियाने एक मोठा खळबळजनक दावा केला आहे. रशियाच्या सरंक्षण मंत्रालयाने त्यांच्या सैन्याने युक्रेनच्या दोन गावांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याच वेळी अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांची बैठक सुरु होती. या वेळेतच रशियाने युक्रेनच्या पूर्व भागातील दोन गावांवर कंट्रोल मिळवल्याचे सांगितले आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने युक्रेनच्या डोनेस्टक भागातील कोलोडियाजी आणि निप्रोपेट्रोव्स्कमधील वोरोन गावावर नियंत्रण मिळवले आहे. याच वेळी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी, रशियाने युक्रेनवर ८५ ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली असल्याचे म्हटले आहे. हा हल्ला आणि ताबा रशिया युक्रेन युद्धबंदीच्या शांतता करारासाठी अत्यंत धोकादायक मानला जात आहे.
दरम्यान अलास्कामधील बैठकीपूर्वी युक्रेन अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी एक मोठे विधान केले होते. त्यांनी रशियाचा युद्धबंदीचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे, ट्रम्प आणि पुतिन यांच्या बैठकी दिवशीच रशियाने युक्रेनमध्ये हत्याकांड केला आहे. यावरून मॉस्कोला युद्ध संपवायचे नसल्याचे स्पष्ट होते.
On the day of negotiations, the Russians are killing as well. And that speaks volumes. Recently, weʼve discussed with the U.S. and Europeans what can truly work. Everyone needs a just end to the war. Ukraine is ready to work as productively as possible to bring the war to an end,… pic.twitter.com/tmN8F4jDzl
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) August 15, 2025
डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात काल (१५ ऑगस्ट २०२५) अलास्कामध्ये बैठक पार पडली. या बैठकीचा उद्देश रशिया युक्रेन युद्धावर (Russia Ukraine War) तोडगा काढणे होता. पण या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. या बैठकीनंतर आता ट्रम्प युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की सोमवारी (१८ ऑगस्ट) वॉशिंग्टनला ट्रम्पच्या भेटीसाठी जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी आता रशिया युक्रेन युद्ध संपवणे हे झेलेन्स्कींवर अवलंबून असल्याचे म्हटले.