Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War: पंतप्रधान नेतन्याहू यांच्या हत्येचा प्रयत्न; इस्त्रायलचा इराणवर खोटेपणाचा आरोप

इस्रायल-इराण संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ले करण्यात आले. या हल्ल्यानंतर इस्रायलने इराणवर गंभीर आरोप केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 20, 2024 | 11:08 AM
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर बॉम्ब हल्ला

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर बॉम्ब हल्ला

Follow Us
Close
Follow Us:

जेरूसेलम: इस्रायल-इराण संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ले करण्यात आले. या हल्ल्यानंतर इस्रायलने इराणवर गंभीर आरोप केले आहेत. शनिवारी, हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवर 100 पेक्षा अधिक रॉकेट्स डागले. यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 10 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. यासोबतच लेबनॉनमधून पाठवलेल्या ड्रोनने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

इराणच्या प्रॉक्सी हिजबुल्लाहने हत्येचा प्रयत्न करून मोठी चूक केली आहे

या घटनेनंतर, नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहच्या या हल्ल्याला गंभीर चूक म्हणत त्याचा कठोर प्रतिसाद दिला. नेतन्याहू म्हणाले की, “इराणच्या प्रॉक्सी हिजबुल्लाहने माझ्या आणि माझ्या पत्नीच्या हत्येचा प्रयत्न करून मोठी चूक केली आहे. आम्ही आमचे शत्रूविरुद्धचे युद्ध सुरू ठेवू.” हिजबुल्लाहच्या या हल्ल्यानंतर, इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमधील दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केले. इस्रायलचे हवाई दल इराण समर्थित हिजबुल्लाह आणि गाझामधील हमासच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करत आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल कॅट्स यांनी इराणवर हल्ल्याचा जबाबदार ठरवत खोटेपणाचा आरोप केला आहे.

The attempt by Iran’s proxy Hezbollah to assassinate me and my wife today was a grave mistake.

This will not deter me or the State of Israel from continuing our just war against our enemies in order to secure our future.

I say to Iran and its proxies in its axis of evil:…

— Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) October 19, 2024


हे देखील वाचा- हमास प्रमुखाच्या मृत्यूवर इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहूंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

इराणने जबाबदारी नाकारली 

मात्र मिळालेल्या माहितीनुसार इराणने या हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे. आणि हिजबुल्लाहच्या सहभागाचा दावा केला आहे. यावर इस्रायलचे परराष्ट्रमंत्री कॅट्स यांनी ट्विट करत इराणवर कठोर टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, “इराणने हिजबुल्लाहसारख्या गटांना तयार करून, त्यांना सशस्त्र करून आणि आता नियंत्रित करूनही स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे खोटे बोलणे तुम्हाला वाचवणार नाही.”

युद्ध सुरूच राहणार

नेतान्याहू आणि कॅट्स दोघांनीही इराणच्या भूमिकेवर जोर देत दहशतवादाविरुद्ध लढाई चालू ठेवण्याचे स्पष्ट संकेत दिले. इस्रायलने या हल्ल्यांनंतर आपली सुरक्षा मजबूत केली आहे आणि शत्रूंवर कठोर कारवाई करण्याचे वचन दिले आहे. या घटनाक्रमामुळे इस्रायल-इराण तणाव अधिक गडद झाला असून, दोन्ही देशांतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा- Israel-Hamas War: इस्त्रायलच्या हल्ल्यात हमासचा खास व्यक्ती ठार; युद्धाची भीषणता वाढणार

Web Title: Iran israel war attempted assassination of prime minister netanyahu nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 10:57 AM

Topics:  

  • Hezbollah
  • iran
  • Israel

संबंधित बातम्या

‘Operation Gideon’s Chariots’ इस्रायलची गाझा बळकावण्यासाठी नवी खेळी;  हजारो जीव धोक्यात
1

‘Operation Gideon’s Chariots’ इस्रायलची गाझा बळकावण्यासाठी नवी खेळी; हजारो जीव धोक्यात

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
2

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
3

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

इराण इराकच्या ‘त्या’ डीलने अमेरिका धोक्यात? डोनाल्ड ट्रम्प यांची वाढली चिंता
4

इराण इराकच्या ‘त्या’ डीलने अमेरिका धोक्यात? डोनाल्ड ट्रम्प यांची वाढली चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.