Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराण हट्टाला पेटला! अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही ‘Fordow Nuclear Power Plant’च्या सॅटेलाईट प्रतिमा पाहून इस्रायल अस्वस्थ

Fordow uranium enrichment active : अमेरिकेच्या कठोर इशाऱ्यांनंतर आणि ‘Operation Midnight Hammer’ अंतर्गत अणुऊर्जा केंद्रांवर झालेल्या हवाई हल्ल्यांनंतरही इराण आपल्या अणुऊर्जा कार्यक्रमावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 28, 2025 | 03:55 PM
Iran's Fordow plant active Israel rattled despite US strike

Iran's Fordow plant active Israel rattled despite US strike

Follow Us
Close
Follow Us:

Fordow uranium enrichment active : अमेरिकेच्या कठोर इशाऱ्यांनंतर आणि ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ अंतर्गत अणुऊर्जा केंद्रांवर झालेल्या हवाई हल्ल्यांनंतरही इराण आपल्या अणुऊर्जा कार्यक्रमावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने समोर आलेल्या उपग्रह प्रतिमांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली असून, इस्रायलच्या सुरक्षाव्यवस्थेवरही चिंता व्यक्त केली जात आहे.

फोर्डो अणुऊर्जा केंद्रावर पुन्हा हालचाली सुरू

अमेरिकेने २१ आणि २२ जूनच्या रात्री इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुऊर्जा केंद्रांवर बंकर-बस्टर बॉम्ब फेकून मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला होता. यामागे उद्देश स्पष्ट होता. इराणच्या अणुऊर्जा क्षमतेला रोखणे. मात्र, मॅक्सार टेक्नॉलॉजीजच्या उपग्रह प्रतिमांनुसार, फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात पुन्हा खोदकाम आणि बांधकाम सुरू झाले आहे. नवीन प्रतिमांमध्ये बुलडोझर, ट्रक, क्रेन्स आणि जड यंत्रसामग्री स्पष्टपणे कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. बोगद्यांच्या जवळ नवे रस्ते तयार होताना आणि ताजी माती टाकलेली असल्याचे संकेत मिळाले आहेत. या घडामोडींनी अमेरिका आणि इस्रायलची डोकेदुखी वाढवली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सिंधू पाणी करारावरून भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने; लवाद न्यायालयाच्या निर्णयाने पाकिस्तान आनंदित, भारताचा स्पष्ट नकार

इराणचे अणुकार्यक्रम लपविण्याचा डाव?

तज्ञांच्या मते, अमेरिकेच्या हल्ल्याआधीच इराणने आपल्या संवेदनशील अणुसाहित्याला सुरक्षित स्थळी हलवले असण्याची शक्यता आहे. काही बोगद्यांना मातीने भरून, बॉम्बहल्ल्यांपासून संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा उभारणी होणे म्हणजे, इराणने अणुकार्यक्रम फक्त तात्पुरते थांबवले होते आणि तो पुन्हा सुरू करण्याचा इरादा स्पष्ट करत आहे.

BREAKING: 🇮🇷 🇺🇸

Most of the highly enriched uranium at Fordow was transferred to an undisclosed location before the American attack – Reuters

16 trucks gathered on 19- 20 June with heavy machinery near the entrance to the main facility.

Trump failed. pic.twitter.com/z5bV75cXEf

— ADAM (@AdameMedia) June 22, 2025

credit : social media

अमेरिकेची आणि IAEA ची प्रतिक्रिया

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले की, “फोर्डोमध्ये 60% समृद्ध युरेनियम होते, पण हल्ल्याच्या वेळी ते प्रत्यक्षात तिथे होते की नाही, हे निश्चित सांगता येत नाही.” अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी मात्र दावा केला की, “आमचा हल्ला अत्यंत अचूक होता आणि आम्ही साइटची कार्यक्षमता पूर्णतः नष्ट केली आहे.” त्याचवेळी, IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी) नेही एक निवेदन जाहीर करून सांगितले की, “फोर्डो येथील सेंट्रीफ्यूज सध्या कार्यरत नाहीत.” मात्र त्यांनी हेही स्पष्ट केले की, “प्रत्यक्ष तपासणी किंवा गुप्तचर माहिती मिळाल्याशिवाय परिस्थितीबाबत खात्रीपूर्वक काही सांगता येणार नाही.”

इस्रायलचा अस्वस्थतेत वाढ, सूडाची शक्यता

इराणमधील राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये सूड घेण्याचे संकेत दिले जात आहेत. इस्रायलच्या विरोधात कारवाई होऊ शकते, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. इराण आता दोन पर्यायांवर काम करत आहे. अणुऊर्जा क्षमतेची पुनर्स्थापना किंवा ती लपविण्याची रणनीती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  युद्ध आहे की Meme War! ‘Daddy शिवाय पर्याय नाही…’ इराणने डोनाल्ड ट्रम्पचे नाव घेऊन इस्रायलला डिवचले

 आण्विक संघर्षाच्या दिशेने पावले?

इराणच्या फोर्डो प्रकल्पातील हालचाली आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही दिसणारा इराणचा हट्ट हे दर्शवतो की, संभाव्य आण्विक संघर्षाकडे जग पुन्हा झुकत आहे. अमेरिकेचा दबाव, इस्रायलची अस्वस्थता आणि इराणचा जिद्दीपणा यामुळे पुढील काही दिवस मध्य पूर्वेत तणावाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरातील अणुशक्तीविषयक यंत्रणांची आणि शांततेच्या प्रयत्नांची मोठी कसोटी लागणार आहे.

Web Title: Irans fordow plant active israel rattled despite us strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran Vs America
  • third world war

संबंधित बातम्या

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?
1

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

म्यानमार गृहयुद्ध भीषण वळणावर; लढाऊ विमानांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी
2

म्यानमार गृहयुद्ध भीषण वळणावर; लढाऊ विमानांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी
3

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी

पाकिस्तानात पुन्हा रक्तरंजित मोहीम! खैबर पख्तूनख्वात लष्कराची मोठी कारवाई; 55 हजार विस्थापित, लाखो लोक कर्फ्यूमध्ये कैद
4

पाकिस्तानात पुन्हा रक्तरंजित मोहीम! खैबर पख्तूनख्वात लष्कराची मोठी कारवाई; 55 हजार विस्थापित, लाखो लोक कर्फ्यूमध्ये कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.