
अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष वाढला
कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला होण्याची शक्यत
अमेरिकेचे सैन्य मोठ्या प्रमाणात इराणच्या दिशेने रवाना
गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिकेमध्ये संघर्ष वाढला आहे. शांतता चर्चा निष्फळ झाल्याने अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकतो असे म्हटले जात आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात अमेरिका इराणवर हल्ला कण्याची शक्यता आहे. अमेरिकेने लष्करी तयारी सुरू केली आहे. दरम्यान अमेरिकेने दिलेल्या धमकीला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा इराणने दिला आहे.
सध्या जगभरात युद्धाचे सावट आहे. सध्या जगभरात युद्धाचे सावट आहे. आमच्यावर कोणत्या प्रकारचा लष्करी हल्ला झाला तर इराण शांत बसणार नाही. जशात तसे प्रत्युत्तर देईल. इराणने संयुक्त राष्ट्राच्या मंचावरून अमेरिका खुली धमकी दिली आहे. अमेरिकेचे लष्करी ठिकाणे आमच्या निशाण्यावर असतील असा इशारा इराणने दिला आहे.
अमेरिकेने इराणला अण्वस्त्र करारसाठी 10 ते 15 दिवसांचा वेळ इराणला दिला आहे. त्यानंतर इराणने अमेरिका उत्तर दिले आहे. हा करार न झाल्यास इराणला मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेने दिला आहे. त्यामुळे आता इराण सतर्क झाला असून संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन अमेरिका प्रत्युत्तर दिले आहे.
इराणने अमेरिकेवर चुकीचे धमकी देण्याचा आरोप केला आहे. सुरक्षा परिषदेने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी इराणने केली आहे. आम्ही स्वताहून युद्ध करू इच्छित नाहीत असे इराणने स्पष्ट केले आहे. इराणने आपल्या बचवासाठी यूएन आर्टिकल 51 चा वापर केला आहे.
अमेरिका Iran चा बळी घेणार?
दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये तीन तासांपेक्षा जास्त काळ दीर्घ चर्चा करण्यात आली. काही विषयांवर सहमती झाली असली तरी अनेक मुद्यांवर तीव्र विरोध दिसून आला. इराण पूर्णपणे शरण यायला तयार नाहीये. चर्चा रास्ता बंद झाल्यास सैन्य कारवाई हा एकमेव पर्याय असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
इराणमध्ये उद्यापासून रमजानचा पवित्र महिना सुरू होणार आहे. याच दरम्यान अमेरिका युद्धाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेने इराणला दोन आठवड्यांची मुदत दिल्याचे समोर आले आहे. या कालावधीत काही प्रतिसाद न आल्यास मोठी लष्करी कारवाई केली जाण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे.