Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamenei declares victory : ‘इराणनेच जिंकला रणसंग्राम…’ खामेनेईंनी बंकरमधूनच केली विजयाची घोषणा, इस्रायलला कडवा इशारा

Khamenei declares victory : इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी अखेर देशातील जनतेला संबोधित करत इराणच्या विजयाची घोषणा केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 26, 2025 | 04:58 PM
Iran's Supreme Leader Khamenei declared victory after the ceasefire with Israel

Iran's Supreme Leader Khamenei declared victory after the ceasefire with Israel

Follow Us
Close
Follow Us:

Khamenei declares victory : इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी अखेर देशातील जनतेला संबोधित करत इराणच्या विजयाची घोषणा केली आहे. त्यांनी झिओनिस्ट शत्रू म्हणजेच इस्रायलचा पराभव झाल्याचा दावा केला असून, अमेरिका देखील या युद्धात अपयशी ठरल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. हे भाषण त्यांनी तेहरानमधील एका सुरक्षित बंकरमधून दिल्याचे मानले जात आहे. ही युद्धबंदी २४ जून रोजी लागू झाली आणि त्यानंतरच खमेनींनी हे भाषण दिले. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले, “इराणी राष्ट्र कधीही शरण जात नाही. आमच्या इतिहासाने हे पुन्हापुन्हा सिद्ध केले आहे.”

अमेरिकेच्या हस्तक्षेपावर खमेनींची टीका

इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी आपल्या भाषणात अमेरिकेच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. त्यांचा दावा आहे की, अमेरिकेने युद्धात उडी मारली कारण त्यांना वाटले की जर त्यांनी हस्तक्षेप केला नाही, तर इस्रायल पूर्णपणे नष्ट होईल. “या युद्धातून अमेरिका काहीही मिळवू शकली नाही, उलटपक्षी आम्ही त्यांना मजबूत उत्तर दिले,” असे खमेनी म्हणाले. त्यांनी इस्लामिक रिपब्लिकच्या विजयाचा गौरव करताना म्हटले की, झिओनिस्ट राजवट आमच्या आघातांनी चिरडली गेली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘पैशाने क्लास खरेदी करता येत नाही’, जेफ बेझोस लग्नाच्या कार्डवरून झाले ट्रोल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

खमेनी सुरक्षित बंकरमध्ये हलवले गेले

New York Times च्या अहवालानुसार, इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमुळे इराणच्या सुरक्षादलांनी खमेनींना राजधानी तेहरानमधील एका गुप्त बंकरमध्ये हलवले होते. तिथूनच त्यांनी हा ऐतिहासिक संदेश दिल्याचे समजते. या घोषणेनंतर इराणमध्ये सार्वत्रिक उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरकार समर्थकांनी रस्त्यावर उतरून “इस्लामिक रिपब्लिक जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या आहेत.

इराणची लष्करी तयारी कायम

जरी युद्धबंदी जाहीर झाली असली तरी इराणची लष्करी सज्जता कायम आहे. इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, जर इस्रायल किंवा अमेरिका पुन्हा हल्ला करतील, तर इराण पूर्ण ताकदीने उत्तर देईल. पाश्चात्य गुप्तचर संस्थांच्या आणि माध्यमांच्या अहवालांनुसार, इराणचा अणुउर्जा कार्यक्रम अजूनही पूर्णपणे थांबलेला नाही. त्यामुळे इस्रायलकडून भविष्यात पुन्हा एकदा कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी देखील पुनःहल्ल्याची शक्यता नाकारलेली नाही. त्यामुळे येत्या काळात पुन्हा संघर्ष उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढती चिंता

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायात चिंतेचे वातावरण आहे. अमेरिका, युनायटेड नेशन्स आणि युरोपियन संघटना दोन्ही देशांना संयम पाळण्याचे आवाहन करत आहेत. विशेषतः इराणच्या अणुउर्जा कार्यक्रमाविषयी वाढती शंका, खमेनींचे बंकरमधून भाषण, आणि अमेरिका-इस्रायलचा निष्फळ हस्तक्षेप  यामुळे मध्यपूर्वेतील राजकीय आणि लष्करी समिकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतासाठी वरदान असलेले ‘ब्राह्मोस’ बनवण्यामागे आहे ‘या’ बड्या नेत्याचा वरदहस्त; डॉ. शिवथनु पिल्लई यांचा खुलासा

विजय घोषणेने इराणी जनतेमध्ये आत्मविश्वास

खामेनेईंच्या या विजय घोषणेने इराणी जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला असला, तरी परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या भविष्यातील हालचाली, इराणची लष्करी तयारी आणि अणुउर्जा कार्यक्रम यामुळे मध्यपूर्व पुन्हा एका संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. युद्धबंदी तात्पुरती असली तरी, खरा प्रश्न आहे  ही शांतता किती काळ टिकणार?

Web Title: Irans supreme leader khamenei declared victory after the ceasefire with israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • iran

संबंधित बातम्या

Russia Ukraine war : गाझा संकट सोडवण्याची मोठी हालचाल; Putin-Netanyahu यांच्यात इराण संबंधित सिक्रेट फोन चर्चा
1

Russia Ukraine war : गाझा संकट सोडवण्याची मोठी हालचाल; Putin-Netanyahu यांच्यात इराण संबंधित सिक्रेट फोन चर्चा

Iran Crisis : इराण स्फोटक स्थितीत! 92% नागरिक नाराज; सरकारवर राजकीय अविश्वासाची टांगती तलवार
2

Iran Crisis : इराण स्फोटक स्थितीत! 92% नागरिक नाराज; सरकारवर राजकीय अविश्वासाची टांगती तलवार

Tehran Chaos : पाकिस्तानच्या सीमेवर ‘हा’ देश बांधणार आपली राजधानी; तेहरानमध्ये सध्या परिस्थिती अस्थिर
3

Tehran Chaos : पाकिस्तानच्या सीमेवर ‘हा’ देश बांधणार आपली राजधानी; तेहरानमध्ये सध्या परिस्थिती अस्थिर

Delhi Bomb Blast : लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर मुस्लिम जगाचं मोठं विधान; सौदी-युएई-इराणची अनपेक्षित प्रतिक्रिया
4

Delhi Bomb Blast : लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर मुस्लिम जगाचं मोठं विधान; सौदी-युएई-इराणची अनपेक्षित प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.