Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवाढव्य युद्धनौका, १०० हून अधिक जेट्स, इराणची खैर नाही! 23 वर्षानंतर सर्वात मोठ्या ताकदीने अमेरिका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत

अमेरिकेने मध्यपूर्वेत प्रचंड सैन्य तैनात केले आहे, विशेषतः इराणविरोधी लष्करी ऑपरेशन्ससाठी. ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याचे विविध पर्याय प्रस्तावित केले आहेत. इराणने या आव्हानावर प्रतिउत्तर देण्याची धमकी दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 20, 2026 | 02:49 PM
iran vs us

iran vs us

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेची इराणच्या विरोधात मोठी लष्करी शक्ती तैनात
  • इराणवर ‘या’ ठिकाणांवर होऊ शकतो हल्ला
  • इराण कसा करु शकतो पलटवार?
IRAN VS US : जागतिक स्तरावर आता मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद होत आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २००३ च्या इराक युद्धानंतरची मध्यपूर्वेत सर्वाधिक सैन्य तैनात केले आहे. तब्बल २ दशकांनंतर अमेरिकेने आपली इतकी प्रचंड ताकद उतरवल्यानंतर या दोन्ही देशांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

महासत्तेची प्रचंड लष्करी तटबंदी

अमेरिकेने इराणला घेरण्यासाठी आपली अत्याधुनिक युद्धसामग्री Persian Gulfमध्ये आणि आसपासच्या भागात तैनात केली आहे. यामध्ये प्रमुख शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. जगातील सर्वात मोठी युद्धनौका ‘यूएसएस जेराल्ड फोर्ड’ हे महाकाय एअरक्राफ्ट इराणच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. त्याचबरोबर स्टील्थ फाइटर जेट, बॉम्बर विमान, मिसाइल-डिफेंस डेस्ट्रॉयर यांचाही यात समावेश आहे.

अमेरिकेकडे किती मोठं सैन्य?

सध्याच्या मिडिल ईस्टमधील अमेरिकेच्या सामर्थ्याबाबत बोललं तर –
२ विमानवाहू वाहक- USS अब्राहम लिंकन, USS जेराल्ड आर. फोर्ड
9 मिसाईल डिफेन्स डिस्ट्रॉयर्स
3 विशेषज्ञ नौदल जहाजे
F-35, F-22, F-15 आणि F-16 सह 114 हून जास्त फाइटर जेट
6 बॉम्बर विमानं
800 हून अधिक मिसाइले
याशिवाय E-3 AWACS (एअरबोर्न वॉर्निंग सिस्टीम) आणि कमांड-अँड-कंट्रोल विमानेही तैनात करण्यात आली आहेत.

ट्रम्प कुठे करु शकतात हल्ला?

‘द सन’च्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी सांगितल की, ट्रम्प यांना बरेच पर्याय दिले आहेत.
इराणच्या परमाणू साइट्सवरच मर्यादित हल्ला.
क्षेपणास्त्र साइट्स नष्ट करणं
इराणच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाला लक्ष्य केले.
प्रदीर्घ बॉम्बस्फोट करणं
हल्ला झाल्यास तो बऱ्याच आठवड्यांपर्यंत चालू शकतो. जूनमध्ये झालेल्या ‘मिडनाईट हॅमर’ हल्ल्यापेक्षा बराच मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे.

इराणवर हल्ला होणार?

अमेरिकेने इतक्या मोठ्या प्रमाणावर लष्करी शक्ती एकवटली आहे. त्यामुळे आता अमेरिका इराणवर हल्ला करणार का?, हा एकच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुढील १० दिवसांचा कालावधी दिला आहे. हा १० दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर अमेरिका कोणतं पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून रहिलं आहे.

इराण कसा करु शकतो पलटवार?

इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकन विमानवाहू नौका डुबवू असा थेट इशारा दिला आहे.
इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतुकीचा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये थेट-फायरचा सरावही केला आहे. हा रस्ता इराण रोखू शकतो ज्याचा परिणाम सौदी, यूएईसारख्या देशांवर होऊ शकतो.

पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…

Web Title: America iran biggest military deployment 100 jets warships

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • iran
  • Iran Attack
  • World news

संबंधित बातम्या

पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…
1

पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी
2

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

भारताच्या शेजारी तुर्कीचा मोठा गेम! कट्टरपंथीयांच्या पाठिंब्यासाठी ज्युनियर एर्दोगान बांगलादेशात? नेमकं काय शिजतंय?
3

भारताच्या शेजारी तुर्कीचा मोठा गेम! कट्टरपंथीयांच्या पाठिंब्यासाठी ज्युनियर एर्दोगान बांगलादेशात? नेमकं काय शिजतंय?

ब्रिटनच्या राजघराण्यात भूकंप! Epstein प्रकरणात प्रिन्स अँड्र्यू यांना अटक, जगात खळबळ
4

ब्रिटनच्या राजघराण्यात भूकंप! Epstein प्रकरणात प्रिन्स अँड्र्यू यांना अटक, जगात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.