Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…

इराण - अमेरिका यांच्यातील वाढत्या लष्करी तणावादरम्यान, इराणमधील एक लढाऊ विमान कोसळले, ज्यात पायलटाचा मृत्यू झाला. हा अपघात अशावेळी झाला, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याची धमकी दिली होती.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 20, 2026 | 02:00 PM
iran fighter jet crash

iran fighter jet crash

Follow Us
Follow Us:
  • इराणमधील लढाऊ विमान कोसळलं
  • ट्रम्प प्रशासनाचा लष्करी हल्ल्याचा दिलेला इशारा
  • इराणने पत्र लिहून दिला UN ला इशारे
Iran fighter jet crash : इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध हे जागतिक राजकारणातील सर्वात गुंतागुंतीच्या आणि तणावपूर्ण विषयांपैकी एक आहेत. या दोन्ही देशातील वाढत्या लष्करी तणावादरम्यान इराणला मोठा झटका बसला आहे. पश्चिम इराणमधील हमादान येथे प्रशिक्षणादरम्यान इराणचं एक लढाऊ विमान कोसळलं आणि त्या0त वैमानिकाचा मृत्यू झाला. इराणच्या सरकारी माध्यमांशी संबंधित जोडल्या गेलेल्या प्रेस टीव्हीने या अपघाताची पुष्टी केली आहे. हा अपघात अशावेळी झाला आहे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हल्ल्याची धमकी दिली होती.

पाकिस्तानच्या कराचीत सिलेंडरचा भीषण स्फोट; मोठ्या स्फोटानंतर तीन मजली इमारतच कोसळली, 16 जणांचा मृत्यू

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला काय धमकी दिलेली?

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प प्रशासन इराणवर ‘मर्यादित लष्करी हल्ला’ करण्याचा विचार होता. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या मते, ही कारवाई इराणला नवीन आण्विक करारासाठी भाग पाडण्याच्या उद्देशाने असू शकते. सुरुवातीचे हल्ले हे मर्यादित लष्करी किंवा सरकारी लक्ष्यांवर केले जाऊ शकतात असं सांगण्यात आलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प यांचं काय होतं विधान?

ट्रम्प यांनी अलीकडेच ‘आम्ही करार करु आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे करार करुच’, असं विधान करुन पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट असेल असे संकेत दिले होते. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तानुसार, पेंटागॉन मध्य पूर्वमध्ये मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केलं जात आहे. USS गेराल्ड R. फोर्ड ही विमानवाहू युद्धनौका तैनात करण्यात आली आहे. मार्चच्या मध्यापर्यंत अमेरिकन लष्करी जमाव पूर्णपणे तयार राहणार असल्याची अपेक्षा आहे.

इराणने UN ला काय सांगितलं?

इराणने संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहून इशारा दिला. जर त्यांच्यावर लष्करी हल्ला झाला तर या प्रदेशात असलेल्या शत्रू तळांना कायदेशीर लक्ष्य मानतील. इराणचं म्हणणं आहे की कोणताही देश अण्वस्त्र संवर्धनाचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. इराणने हे पुन्हा स्पष्ट केलं की त्यांना अण्वस्त्रांचा नको आहे पम नागरी उद्देशांसाठी युरेनियम समृद्ध करणं हा त्यांचा अधिकार आहे.

दोन्ही देशांमधील चर्चेत काय घडलं?

दोन्ही देशांमध्ये अलीकडेच जिनेव्हामध्ये चर्चा झाली. तरिही व्हाइट हाउसच यावर हे म्हणणं आहे की अजूनही बऱ्याच मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमध्ये अजूनही एकमत नाही. 2015 च्या न्यूक्लियर करारातून अमेरिकेने माघार घेतल्यापासून दोन्ही देशांमधील तणाव सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे आता हा प्रश्न आहे की ही परिस्थिती हाताळता येईल? की हे मोठे देश आणखी एका लष्करी संघर्षाकडे वाटचाल करतील.

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

Web Title: Middle east iran fighter jet crash us strike threat donald trump nuclear deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • air attack
  • Donald Trump
  • iran
  • World news

संबंधित बातम्या

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’
1

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस
2

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?
3

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट
4

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.