Israel-Houthi Conflict Houthi rebels fired ballistic missiles on Israeli
जेरुसेलम: येमेनमधील हुथी बंडखोरांनी बुधवारी (१४ मे) इस्रायलवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. हुथी बंखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली असून यामुळे इस्रायलमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हल्ला झाल्यावर सायरन वाजू लागल्याने इस्रायच्या आयडीएफ दलाने तातडीने कारवाई करत सर्व क्षेपमास्त्रे हवेतच हाणून पाडली आहेत. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्वे देशांच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतर इस्रायलने हुथी बंडखोरांना चोख प्रत्युत्तरा३ची धमकी दिली आहे.
मीडिया रोपोर्टनुसार येमेनच्या दिशेने बॅलेस्चटिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने दिली. जेरुसेलम आणि वेस्ट बॅंकच्या आसपास अनेक ठिकाणी सायरचा आवाज येऊ लागला. वेळेत माहिती मिळल्याने इस्रायलने सर्व हल्ले धूडकावून लावले.
या हल्ल्यानतंर इस्रायल संतप्त झाल आहे. इस्रायलने येमेनच्या हुथींच्या नियंत्रणाखाली असलेल्या तीन बंदरावर लोकांना इशार दिला आहे. लोकांना बदंर खाली करम्याचा इशार देण्यात आला आहे. तसेच इस्रायलने हुथींनी चोख प्रत्युत्तराची धमकी दिली आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल अवीचाई अद्राई यांनी येमेनी नागरिकांना पश्चिम किनाऱ्यावरील रास इसा, होदेइदा आणि सलिफ बंदारापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. अद्याप इस्रायलने कोणतीही कारवाई केलेली नाही. परंतु लवकरच हल्ला करण्यात येईल असे इस्रायलने म्हटले आहे.
इस्रायलच्या जारी केलेल्या निवदेनात म्हटले आहे की, हुथी बंडखोरांकडून दहशतवादी कारवायांसाठी बंदराचा वापर करण्यात येत आहे. बंदरावरील सर्व लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी पुढील सुचना येईपर्यंत बंदर खाली करण्याचे आवाहन करतो. दरम्यान सध्या इस्रायल हुथी बंडखोरांविरोधात कारवाईच्या तयारीत आहे. हुथी बंडखोरांनी इस्रायलवर ३३ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहे.
#عاجل تحذير مهم ومتكرر لكل المتواجدين في الموانئ البحرية التي يسيطر عليها النظام الحوثي الإرهابي
⭕️ميناء رأس عيسى
⭕️ميناء الحديدة
⭕️ميناء الصليف🔴نحثكم على اخلاء هذه الموانئ حتى إشعار آخر🔴
نظرًا لقيام النظام الحوثي الإرهابي باستخدام الموانئ البحرية لصالح أنشطته الإرهابية نحث… pic.twitter.com/sqdQhvVdWt
— افيخاي ادرعي (@AvichayAdraee) May 14, 2025
यापूर्वी हुथींनी इस्रायलच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ बेन गुरियनवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले होते. ४ मे रोजी हा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हुथी विद्रोहींच्या लाल समुद्रातील होदेदा बंदरावर हल्ला केला होता. हुथींच्या विमानतळावरील हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी इस्रायलने होदेदा बंदरावर हल्ला केला होता.
दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हुथी बंडखोरांना अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी जेरुसेलम आणि बॅंक ऑफ स्टेटच्या आसपास झालेल्या हल्ल्याचा बदला लवकरच घेतला जाईल असे म्हटले आहे.