बलोच महिलेचा आक्रमक पवित्रा पाहून येईल अंगावर काटा; भारताला पाठिंबा देत पाकिस्तानवर केली आगपाखड, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: भारत पाकिस्तान युद्धादरम्यान बलुचिस्तानने पाकिस्तानविरोधात पुन्हा स्वातंत्र्याचा लढा सुरु केला आहे. बलुच आर्मी पाकिस्तानवर आक्रमक झाली आहे. यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झालेली आहे. आधीच भारताच्या कारवाईमुळे संकटात असलेल्या पाकिस्तान आता अंतर्गत तणावात अडकला आहे. दरम्यान बलुच आर्मीने भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे. बलुच आर्मी एकामागून एक भारत आणि संयुक्त राष्ट्रांकडे मागण्या केल्या जात आहे.
दरम्यान सोशल मीडियावर बलुच महरंग महिलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महरंग महिलेने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. व्हिडिओमध्ये महिला म्हणत आहे, पाकिस्तानने कितीही बिलियन डॉलर्स खर्च केले तरी, बलुचिस्तानवर झालेल्या अत्याचाराला लपवू शकणार नाही. पाकिस्तान सरकार इतकी खालच्या थराला गेले आहे की, आम्ही तुमच्याकडे आम्ही न्याय देखील मागू शकत नाही. आम्ही स्वत: न्याय मिळवू. तसेच यामध्ये भारताल पाठिंब्याच्या घोषणा दिल्या जात आहेत.
बलुच आर्मीने बारताला पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास, सांगितले आहे, यासाठी बलुच आर्मीचा पूर्णत: पाठिंबा असल्याचे म्हणत आहे. भारत कदम बढाओ, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या जात आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वीडियो लास्ट में देखें
नारे लग रहे है भारत कदम उठाओ हम तुम्हारे साथ हैं
समय-समय पर बलूचिस्तान के लोग दावा करते रहे हैं कि हमने आजादी हासिल कर ली है ऐसा ही दवा आज फिर चर्चा में है#RepublicOfBalochistan pic.twitter.com/fGkmALuoxV
— Bhanu Nand (@BhanuNand) May 14, 2025
काही दिवसांपूर्वीच बलुच आर्मीने भारताकडे मोठी मागणी केली होती. बलुच सैनिकांनी भारताकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये बलुच आर्मीने भारताला म्हटले आहे की, आमच्या या मागण्या तुम्ही पूर्ण करा, आम्ही पाकिस्तानला नष्ट करु असे म्हटले आहे. बलुच आर्मीने भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीनंतर एक निवेदन जारी केले आहे.
यामध्ये म्हटले आहे की, ” पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतो, त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवणे मूर्खपणा आहे. भारताला पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर, यासाठी आम्हाला मदत करावी. आम्ही पाकिस्ताना योग्य धडा शिकवू असे बलुच आर्मीने म्हटले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने भारताकडे राजकीय, रानैतिक आणि संरक्षण पाठिंब्याची मागणी केली आहे.