इस्रायलचा सीरियाची राजधानी दमिश्कवर भीषण हल्ला, संरक्षण मंत्रालयासह लष्कराचं मुख्यालय उडवलं
इस्रायलने इराणनंतर सीरियाकडे मोर्चा वळवला असून आज सीरियाची राजधानी दमास्कसवर भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात संरक्षण मंत्रालय आणि लष्कराचं मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे मीडल ईस्टमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे. अलिकडेच इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धबंदीची घोषणा करण्यात आली होती. मात्र अरब राष्ट्रांमधला संघर्ष कमी होताना दिसत नाही.
Israel–Syria Strike Highlights
• Strike: Israeli air attack on Syria 🇮🇱💣
• Target: Military sites near Damascus
• Hit: Iran-backed groups 🎯
• Damage: Heavy destruction, casualties reported
• Goal: Stop threats from Syrian soil
• Tension: Rising in the region ⚠️ pic.twitter.com/98FQtSGRzR— Tamal Roy (@tamalroy07) July 16, 2025
इस्रायलने सीरियाच्या संरक्षण मंत्रालय आणि लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. हा हल्ला ड्रोन आणि बॉम्बद्वारे करण्यात आला आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यामुळे राजधानी दमास्कसमध्ये धुराचे लोट दिसत आहेत. इस्रायलने हल्ल्याची पुष्टी केली आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, आयडीएफने ड्रुझवरील हल्ल्याचा बदला घेतला आहे. आयडीएफ सैनिकांनी राजधानी दमिश्कमधील लष्कराच्या मुख्यालयावर आणि संरक्षण मंत्रालयावर थेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन्ही इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.
इस्रायलने ज्या पद्धतीचा सीरियावर हल्ला केला आहे. त्यावरून युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी (१५ जुलै) इस्रायल आणि सीरियामध्ये ड्रुझ मुद्द्यावर एक करार झाला होता, परंतु २४ तासांच्या आत इस्रायलने हल्ला केला आहे.सीरियाच्या सैन्याच्या म्हणण्यानुसार, दमिश्कमधील उमय्याद चौकात इस्रायली ड्रोनने हल्ला केला आहे. हल्ल्यामुळे सीरियाला झालेल्या नुकसानीचे प्रमाण अद्याप मोजण्यात आलेले नाही. यात जीवितहानीही झाल्याचं सांगितलं जात आहे.
इस्रायली माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा इस्रायल संरक्षण दलाचे कर्मचारी दमास्कसवर हल्ला करत होते, तेव्हा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू तेल अवीव येथील न्यायालयात होते. कतारगेट प्रकरणात साक्ष देण्यासाठी नेतान्याहू न्यायालयात आले होते. जेव्हा न्यायाधीशांना दमिश्कवरील हल्ला झाल्याची बातमी मिळाली तेव्हा त्यांनी ताबडतोब कामकाज स्थगित केले. त्यानंतर नेतान्याहू बैठकीसाठी वॉर रूममध्ये दाखल झाले.
सीरियाचे नवीन सरकार तुर्की आणि सौदी अरेबियाच्या जवळचं मानलं जातं. सीरियाचे अध्यक्ष अल-शारा हे सौदी क्राउन प्रिन्सच्या जवळचे आहेत. अलीकडेच, सौदी आणि तुर्कीमुळे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अल शारासोबत कराराविषयी चर्चा झाली होती..अमेरिकेने उघडपणे अल शाराला पाठिंबा दिला, परंतु ज्या प्रकारे इस्रायलने आता सीरियावर हल्ला केला आहे, त्यामुळे पुढे काय होईल याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत? प्रश्न असा आहे की एक दिवस आधी अमेरिकेने दोन्ही देशांना युद्धबंदीची घोषणा करण्याचे निर्देश दिले होते.इस्रायल आणि सीरिया सध्या अमेरिकेच्या जवळ आहेत, परंतु दमिश्कवरील इस्रायली हल्ल्यामुळे पुन्हा तणाव वाढला आहे. जर सीरियाने तडजोड केली नाही तर इस्रायलला दुसऱ्या युद्धात उडी घ्यावी लागू शकते. गेल्या २ वर्षात इस्रायलने येमेन, इराण, लेबनॉनसोबत याधीही युद्ध केलं आहे.