आता सीरियाचे अध्यक्ष अल-शारा यांना संपवा, नेतन्याहू यांच्या मंत्र्यांनी उघडपणेच केले जाहीर( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Minister Chikli : मध्य पूर्वेत सध्या परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. इस्रायल आणि सीरिया यांच्यातील संघर्षाला नव्या वळण लागले आहे. इस्रायलचे मंत्री अमिचाई चिकली यांनी सीरियाचे हंगामी अध्यक्ष अहमद अल-शारा यांच्यावर थेट हल्ला चढवत एक धक्कादायक विधान केले आहे “शारा यांना संपवण्याची वेळ आली आहे.” या विधानामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजली आहे.
चिकली यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिताना शारा यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यांनी म्हटले की, “अल-शारा हे हमाससारखे वागत आहेत आणि त्यांचे वर्तनही दहशतवादी नेत्यासारखेच आहे.” चिकली यांच्या या विधानानंतर मध्यपूर्वेतील राजकीय वातावरण तापले असून तणाव अधिक गहिरा झाला आहे.
डिसेंबर 2024 मध्ये बशर अल-असद यांचे शासन कोसळल्यानंतर, सीरियामध्ये सत्ता शून्यता निर्माण झाली आणि अहमद अल-शारा हे हंगामी अध्यक्ष म्हणून पुढे आले. त्याच वेळी, इस्रायलने सीरियाच्या दक्षिण भागात आपले हस्तक्षेप वाढवले. गोलान टेकड्यांपलीकडे इस्रायली लष्कराने मोर्चेबांधणी केली आहे. या भागात इस्रायलने युद्धक्षेत्र घोषित करत ड्रुझ समुदायाच्या रक्षणाचा दावा केला आहे.
ड्रुझ हे सीरियातील एक अल्पसंख्यांक समुदाय असून सुमारे ७ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या समाजाला अल-शाराच्या समर्थकांकडून मारहाण आणि हल्ले होतात, असा इस्रायलचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलने सैन्य कारवाया सुरू केल्या असून टँक हल्ले आणि गोळीबाराचे अनेक प्रकार समोर आले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी
⚡️BREAKING: Israeli Minister Amichai Chikli calls for Israel to eliminate Syria’s president:
“We must not stand idly by in the face of the Islamist-Nazi terror regime of Al-Qaeda in a suit and tie.
Anyone who thinks Ahmad al-Shara is a legitimate leader is gravely mistaken — he… pic.twitter.com/A961XMmXEJ
— Suppressed News. (@SuppressedNws) July 15, 2025
credit : social media
इस्रायली नेत्यांनी अल-शाराविरुद्ध जी भाषा वापरली आहे, ती ‘लक्ष्यित हत्या’ (Targeted Killing) या धोरणाची आठवण करून देते. इस्रायलने पूर्वी अनेक वेळा जॉर्डन, इराण आणि पॅलेस्टाईनमधील प्रमुख नेत्यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे चिकली यांचे विधान केवळ राजकीय डावपेच नसून त्यामागे प्रत्यक्ष कारवाईची शक्यताही आहे. अहमद अल-शाराला सौदी अरेबिया आणि तुर्की यांचा पाठिंबा आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील शारा यांना मान्यता दिलेली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही या विधानाचे पडसाद उमटले आहेत.
सध्याची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, अमेरिकेने दोन्ही देशांना इस्रायल आणि सीरियाला ड्रुझ समुदायाच्या संदर्भात तात्काळ युद्धबंदी करण्यास सांगितले आहे. हे दर्शवते की, हा संघर्ष केवळ स्थानिक किंवा प्रादेशिक न राहता, जागतिक शक्तींच्या ध्यानात आलेला आहे.
सध्या अल-शारावरील थेट कारवाई झाली नाही, तरी इस्रायली धोरणे पाहता कोणतीही घटना घडू शकते. गेल्या काही वर्षांत इस्रायलने ‘लक्ष्य ठरवा आणि संपवा’ हे धोरण कायम राखले आहे. त्यामुळे अल-शाराच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध होणार मोठी कारवाई; ‘या’ कारणामुळे अल्बर्टाचे सरकार आक्रमक पवित्र्यात
सीरियात सत्तापरिवर्तनानंतर निर्माण झालेली अस्थिरता आणि इस्रायलची आक्रमक भूमिका यामुळे मध्यपूर्व पुन्हा एकदा अशांततेच्या उंबरठ्यावर उभा आहे. नेतन्याहू सरकारमधील मंत्र्यांचे हे उघड विधान म्हणजे केवळ चेतावणी नाही, तर पुढील संकटाचा संकेत देणारी गंभीर हालचाल आहे.