Israeli airstrikes escalate tensions in Lebanon Ceasefire status
लेबनॉन : IDFने दावा केला आहे की सीरियाच्या सीमेवरून लेबनॉनमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याशिवाय हिजबुल्ला या भागात लष्करी पायाभूत सुविधाही तयार करत आहे, जे विद्यमान युद्धविरामाचे उल्लंघन आहे. इस्त्रायली हवाई दलाने गुरुवारी (6 फेब्रुवारी) लेबनॉनमध्ये पुन्हा हवाई हल्ले केले. इस्रायली हवाई दलाने लेबनॉनमधील लितानी नदीजवळ हिजबुल्लाहच्या दोन लष्करी तळांवर हल्ला केला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) सांगितले की, हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्र तळांवर ही हवाई कारवाई करण्यात आली.
आयडीएफने दावा केला आहे की सीरियाच्या सीमेवरून लेबनॉनमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, जे विद्यमान युद्धविरामाचे उल्लंघन आहे. याशिवाय हिजबुल्ला या भागात लष्करी पायाभूत सुविधाही तयार करत आहे, त्यामुळे लेबनॉनवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत.
इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सध्या युद्धविराम करार लागू आहे आणि हा युद्धविराम लागू असतानाही हा इस्रायली हल्ला झाला. अशा स्थितीत युद्धबंदी भंग होण्याची भीती आहे. सध्या, दोन्ही देशांमध्ये कोणताही नवीन करार नसताना, हा युद्धविराम 18 फेब्रुवारीपर्यंतच सुरू राहणार आहे. इस्रायली लष्कराने लेबनॉनवर आरोप केला की हिजबुल्लाह सीरियामार्गे लेबनॉनमध्ये शस्त्रे जमा करत आहे, जे युद्धविरामाच्या विरोधात होते. त्यामुळे इस्रायलने हिजबुल्लाच्या दोन लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump यांनी दिला आणखी एक मोठा धक्का; आता आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावरही घातला निर्बंध
इस्रायलने हिजबुल्लावर कोणते आरोप केले?
इस्रायलने म्हटले की युद्धविराम म्हणजे दोन्ही बाजूंनी लढाई थांबवण्यास सहमती दर्शविली. मात्र कोणत्याही बाजूने कोणताही नियम मोडला तर युद्धविराम मोडला जाऊ शकतो. सध्या हिजबुल्लाने या प्रकरणी नियम मोडले आहेत. त्याने शस्त्रे गोळा केली आणि सीमेपलीकडून आणण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच आम्ही हिजबुल्लाच्या स्थानांवर बॉम्बस्फोट करण्याची कारवाई केली. उल्लेखनीय आहे की, इस्रायल आणि लेबनॉनमध्ये अनेकदा तणाव निर्माण होतो. गेल्या वर्षीही या दोघांमध्ये खूप तणाव निर्माण झाला होता. इस्रायलने लेबनॉनवरही जोरदार बॉम्बफेक केली आणि तेथे युद्ध झाले. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये युद्धविराम करार लागू झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump भारताला देऊ शकतात ‘ही’ मोठी खुशखबर! पाकिस्तान आणि चीनच्या मात्र चिंतेत होणार वाढ
युद्धबंदीची स्थिती
एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्या युद्धविराम सुरु असताना अनेक अडथळे निर्माण होते आहेत. तर दुसरीकडे हिजबुल्लाह सोबत झालेल्या युद्धविराम करारात देखील अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. काही दिवसांपूर्वी इस्त्रायलला लेबनॉनमधून सैन्य माघारी घेण्याच्या मुदतीत वाढ करुन मिळाली होती. यामुळे हिजबुल्लाहत याविरोधा अनेक निदर्शन काढण्यात आली. यादरम्यान इस्त्रायली सैन्याने निर्देशकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारामुळे युद्ध पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्वण्यात आली होती.