
benjamin netanyahu and donald trump
‘इस्रायल अमेरिकेचा गुलाम…’ , नेतन्याहूंच्या वक्तव्याने उडाली खळबळ; जाणून घ्या काय म्हणाले?
इराणवर पुन्हा हल्ला करणार इस्रायल?
मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीत इस्रायलचे पंतप्रधान इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि अणु कार्यक्रमाच्या वाढत्या विस्तार आणि धोक्याबाबत ट्रम्पशी चर्चा करती. इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, इराण दिवसेंदिवस आपल्या अणु कार्यक्रमात विस्तार करण्यात यशस्वी होत आहे. ही बाब इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक मानली जात असून यावर आळा घालण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल पुन्हा एकदा इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.
जुलै मध्ये दोन्ही देशांत तीव्र संघर्ष
यापूर्वी इराण आणि इस्रायलमध्ये जूल 2025 दरम्यान तीव्र संघर्ष झाला होता. या संघर्षात इस्रायलने इराणच्या अणु तळांना आणि अणु शास्त्रज्ञांना लक्ष्य केले होते. युद्धादरम्यान अमेरिकेने देखील यामध्ये उडी मारत इराणच्या अणु ठिकाणांना नष्ट केले होते.
सध्या इस्रायलने म्हटले आहे की, इराणचा अणु प्रकल्पाचा विकास दिवसेंदिवस होत असून हा त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका आहे. शिवाय यामुळे जगालाही गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये अमेरिकेच्या हितसंबंधांना देखील धक्का पोहोचू शकतो असे इस्रायलने म्हटले आहे.
याशिवाय गाझातील परिस्थितीवरही नेतन्याहू आणि ट्रम्पमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या गाझामध्ये युद्धबंदी लागू आहे. मात्र युद्धबंदीच्या दुसऱ्या अटी मान्य न केल्याने इस्रायल गाझात सतत हल्ले करत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता निर्माण झाली आहे. गाझातील युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात हमासाला आपली शस्त्रे सोडायची आहेत, तर अमेरिका गाझात अतिरिक्त सैन्य तैनात करणार आहे. मात्र या अटी हमासच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या असून त्या मान्य नसल्याचे हमासने म्हटले आहे. यामुळे गाझात इस्रायलकडून हल्ले होत असून याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.