Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East मध्ये येणार मोठं वादळ? ट्रम्प यांनी इराणच्या दिशने धाडलं ‘मृत्यूचं विमान’, अणु करारावरुन नवा अल्टीमेटम

US Iran Tension : अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत आहे. अमेरिकेने मध्यपूर्वेत आपल्या लष्करी हालाचाली वाढवल्या असून आणखी एक युद्धनौका तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प इराणला थेट इशाराही दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 14, 2026 | 08:20 PM
US Iran Tension

US Iran Tension

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेत पुन्हा तणाव पेटला
  • अमेरिकेने वाढवली युद्धनौकांची तैनात
  • अमेरिका-इराणमध्ये युद्धाची ठिणगी?
US Iran Conflict : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेत अमेरिका (America) आणि इराण (Iran) तणाव पुन्हा तीव्र होताना दिसत आहे. अमेरिकेने मध्यपूर्वेत आपली लष्करी उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढवली असून युद्धनौकांची तैनाती अधिक मजबूत केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी देखील इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्याबाबत मोठे विधान केले असून सत्तापरिवर्तनाचा मोठा गंभीर इशारा दिला आहे. यामुळे दोन्ही देशांत पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे.

गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?

ट्रम्प यांच्या इराणमध्ये सत्तापरिवर्तानाबाबत मोठे विधान

कॅरोलिनामधील फोर्ट बर्ग येथील सैनिकांची भेट ट्रम्प यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादादरम्यान ट्रम्प यांनी सांगितले की, इराणमध्ये सत्तापरिवर्तन चांगली गोष्ट ठरु शकते. त्यांच्या या विधानावरुन इराणच्या धार्मिक नेतृत्वाला हटवण्याच्या तयारीत ट्रम्प असल्याचे दिसून येते. ट्रम्प यांनी हेही चांगले ठरु शकते असे म्हणत काही वेळा भिती निर्माण करण्याची देखील गरज असते असे म्हटले आहे. यावरुन ट्रम्प इराणवर नियंत्रण आणि दबाव ठेवत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मध्यपूर्वेत अमेरिकेच्या लष्करी हालचाली

दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकने जगातील सर्वात मोठा विमानवाहू युद्धपोत USS Gerald R. Ford तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर काही युद्धनौकांची तैनाती देखील वाढवली आहे. अमेरिकेचे हे नवे विमानवाहू जहाज कॅरिबियन समुद्रातून रवाना होऊन मध्यपूर्वेत पोहचेल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी असाही इशारा दिला की अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेल्या अणु वाटाघाटी चर्चेवर कोणताही निकाल लागला नाही तर लष्करी पर्यायाचा वापर केला जाईल.

ट्रम्प यांनी हा निर्णय अशा वेळी जाहीर केला आहे, जेव्हा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंशी (Benjamin Netanyahu) त्यांनी मध्यपूर्वेतील परिस्थितीवर संवाद साधला. त्यांच्याशी संवादानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इशारा दिला होता की,  करार न झाल्यास अमेरिका-इ्स्रायल इराणवर लष्करी पर्यायाचा अवलंब करेल. सध्या इस्रायलच्या सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प यांनी कोणत्याही हल्ल्याचे संकेत दिलेले नाही. शिवाय अमेरिका आणि इराणमधील अणु चर्चेला गेल्या आठवड्यात सुरुवात झाली असून  ओमानच्या मध्यस्थीने ही चर्चा सुरु आहे. सध्या या चर्चेत कोणताही ठोस निकाल लागलेला नाही.

Nuclear Talks : चर्चेआड अमेरिकेचा ‘डबल गेम’? ट्रम्प यांचा इराणच्या तेल निर्यातीवर मोठा प्रहार; खामेनेईंना झटका

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणबाबत काय विधान केले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्ता परिवर्तन सर्वात चांगली गोष्ट ठरेल असे म्हटले असून खामेनेईंना थेट इशारा दिला आहे.

  • Que: अमेरिका मध्यपूर्वेत कोणत्या लष्करी हालचाली करत आहे?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका मध्यपूर्वेत हिंद महासागरात सैन्य तैनात करत आहे. नुकतेच अमेरिकेने USS Gerald R. Ford ही विमानवाहून युद्धनौका मध्यपूर्वेत तैनात केल आहे. तसेच इतर युद्धनौकांचीही संख्या वाढवली आहे.

  • Que: अमेरिकेच्या या हालचालीचा मध्यपूर्वेत काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: अमेरिकेच्या या लष्करी हालचालीमुळे मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अस्थिरतेचे आणि दहशतीचे वातावरण वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Middle east war us iran tension nuclear talk trump altimatum khamenei

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.