Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किंग चार्ल्स यांना कँसरची लागण, बकिंगहॅम पॅलेसने दिली माहिती!

ब्रिटनचे किंग चार्ल्स III (King Charles III) यांना कँसरची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 06, 2024 | 08:43 AM
किंग चार्ल्स यांना कँसरची लागण, बकिंगहॅम पॅलेसने दिली माहिती!
Follow Us
Follow Us:

ब्रिटनच्या राजघराण्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. किंग चार्ल्स तृतीय (King Charles III)  यांना कॅन्सरची लागण झाली आहे. बर्किंगहॅम मधील प्रवक्तांनी या संदर्भात एक निवेदन जारी करत माहिती दिली आहे. काही दिवसापासून किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट ग्रंथीसंदर्भात त्रास जाणवू लागला होता. त्याची तपासणी करताना त्यांना कॅन्सरचं निदान झालं आहे. किंग चार्ल्स यांनी कोणता कर्करोग झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नाही आहे.

[read_also content=”अनुष्का शर्मा – विराट कोहलीच्या घरी दुसऱ्यांदा हलणार पाळणा! माजी खेळाडूने दिली गोड बातमी https://www.navarashtra.com/movies/anushka-sharma-virat-kohli-going-to-gave-baby-for-the-second-time-nrps-504672.html”]

निवेदनात काय?

बर्किंगहॅम पॅलेसने दिलेल्या निवेदनानुसार, डाॅक्टरांनी त्यांच्या काही तपसण्या केल्या होत्या. त्यादरम्यान किंगचार्ल्स यांना कॅन्सरचं निदान झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे डॅाक्टरांनी आता त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना सार्वजनिक कामापासून दूर राहण्यास सांगण्यात आलं आहे.  मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असून डॅाक्टर योग्य ती सगळी काळजी घेत आहेत.

पंतप्रधान ऋषी सुनक यांनी किंग चार्ल्स यांना बरं होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

किंग चार्ल्स यांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांना लवकर लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच ते लवकरच पूर्ण ताकतीने परततील याची मला खात्री आहे, संपूर्ण देश त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असेल अशी पोस्ट सुनक यांनी सोशल मीडीयावर प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे.

कोण आहेत किंग चार्ल्स?

किंग चार्ल्स यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ रोजी बकिंघम पॅलेसमध्ये झाला होता, ते चार वर्षांचे असताना त्यांची आई महाराणी एलिझाबेथ या पदावर विराजमान झाल्या होत्या. १९६९ मध्ये २० वर्षांच्या असताना त्यांना महाराणीने कॅरफर्नन कॅसल मध्ये प्रिंस ऑफ वेल्स म्हणून नियुक्त केलं गेलं होतं.

चार्ल्स यांनी २९ जुलै १९८१ मध्ये लेडी डायना स्पेंसर यांच्य़ाशी लग्न केलं. त्या दोघांना दोन मुलं प्रिंस विलियम आणि प्रिंस हॅरी आहेत. २८ ऑगस्ट १९९६ रोजी हे लग्न मोडलं. ९ एप्रिल २००५ मध्ये त्यांनी कॅमिला यांच्याशी लग्न केलं.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर किंग चार्ल्स तृतिय ब्रिटनेच किंग बनले होते. मागील वर्षी मे मध्ये त्यांचा राज्यभिषेक झाला होता. यानंतर त्यांना किंग चार्ल्स तृतिय नावाने संबोधित केले जाते. त्यांचे वय ७३ वर्ष आहे.

Web Title: King charles diagnosed with cancer will undergo treatment buckingham palace nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2024 | 08:43 AM

Topics:  

  • England

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2026: इंग्लंडच्या खेळाडूंसोबत चाललंय तरी काय? आधी फायरिंग, आता बूट चोरीला, अन्…; अमेरिकेतील ‘सुरक्षा’ धोक्यात
1

FIFA World Cup 2026: इंग्लंडच्या खेळाडूंसोबत चाललंय तरी काय? आधी फायरिंग, आता बूट चोरीला, अन्…; अमेरिकेतील ‘सुरक्षा’ धोक्यात

Nightclub Scandal: बेन स्टोक्स देणार कॅप्टन्सीचा राजीनामा? क्रिकेटलाही म्हणणार ‘अलविदा’, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
2

Nightclub Scandal: बेन स्टोक्स देणार कॅप्टन्सीचा राजीनामा? क्रिकेटलाही म्हणणार ‘अलविदा’, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.