
attack on London high-speed train
UK Train Stabbing Attack : शनिवारी रात्री लंडनच्या हंटिग्डन रेल्वेस्थानकावर डॉनकास्टरहून जाणाऱ्या एका हायस्पीड रेल्वेत दोन माथेफिरूंनी प्रवाशांवर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकूहल्ल्यात दहा प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. ट्रेनमध्ये प्रवाशांवर हल्ला केलेल्या हल्लेखोरांना ब्रिटिश पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात दोघांचा समावेश असून त्यांना पोलीस कोठडीत टाकण्यात आले. तत्पूर्वी हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता ब्रिटिश ट्रान्स्पोर्ट पोलिसांनी नाकारली आहे. त्यामुळे दहशतवादविरोधी तपास या घटनेच्या तपासातून वगळण्यात आल्याचे सांगितले आहे.
ही ट्रेन डॉनकास्टरहून लंडनमधील किंग्ज क्रॉस स्टेशनकडे जात असताना पीटरबरो स्टेशन सोडल्यानंतर काही क्षणातच हायस्पीड ट्रेनमध्ये रक्तरंजित घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी सांगितली. सगळीकडे हल्लेखोरांच्या हल्ल्यामुळे गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातील काही प्रवाशांनी समयसूचकता दाखवत आपत्कालीन चेन ओढून हायस्पीड ट्रेन हंटिंग्डन स्टेशनवर थांबवली.
हेही वाचा : Nigeria US Relations: डोनाल्ड ट्रम्पने पुन्हा एकदा टाकली वादची ठिणगी; उडणार आणखी एका धार्मिक युद्धाचा भडका?
ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॅरेबियन वंशाचा ३५ वर्षीय ब्रिटिश नागरिक आणि ३२ वर्षीय ब्रिटिश नागरिक दोघेही यूकेमध्येच जन्मलेले आहेत. त्या दोघांना सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, खुनाचा प्रयत्न, तसेच धारदार शस्त्र सोबत बाळगणे असा आरोपाखाली अटक करण्यात आली. हा हल्ला घडल्यानंतर दहशतवादविरोधी पथक सुरुवातीला तपास करण्यासाठी मदत करत होते. मात्र, हा हल्ला दहशतवाद्यांनी केल्याचे कोणतेच पुरावे न मिळाल्याने दहशतवादविरोधी पथकाला तपास पथकातून वगळण्यात आले.
सोशल मीडियावर घटनेचा निषेध
लंडनच्या हायस्पीड रेल्वेत चाकूहल्ला झाल्यानंतर जखमी दहा जणांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यांनतर आधी नऊ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. मात्र, उपचारानंतर त्यातील 4 जणांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु, त्या जखमी प्रवाशांतील दोन जण अजून अस्थिर अवस्थेत आहेत. या घटनेची माहिती मिळ्ताच संपूर्ण देशभरातून या घटनेबद्दल तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यात तिसरे किंग चार्ल्स, क्वीन कॅमिला आणि पंतप्रधान कीअर स्टार्मर यांचा ही समावेश आहे.