kp sharma oli ram birthplace nepal lipulekh kalapani after resignation remarks on india
नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनाम्यानंतर भारताविरुद्ध पुन्हा वादग्रस्त विधाने केली.
भगवान रामाचा जन्म नेपाळातच झाला होता, तसेच लिपुलेख, कालापानी व लिंपियाधुरा हे नेपाळचेच भूभाग असल्याचा दावा त्यांनी पुन्हा केला.
सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही ओली यांनी स्पष्ट केले की ते सध्या काठमांडू जवळील शिवपुरी सैन्य बॅरेकमध्ये असून, देश सोडून गेलेले नाहीत.
Oli Ayodhya birthplace claim : नेपाळच्या राजकारणात सतत वाद निर्माण करणारे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जनरेशन-झेडच्या तीव्र विरोधानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतरही ओली यांनी आपली भारतविरोधी भूमिका कायम ठेवली आहे. बुधवारी (१० सप्टेंबर २०२५) त्यांनी जाहीर केलेल्या निवेदनात त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले.
ओली म्हणाले की, “मी जर लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा याबाबत तडजोड केली असती, किंवा अयोध्येत भगवान रामाच्या जन्मस्थानावरील चर्चेला विरोध केला नसता, तर मी आजही सत्तेत असतो. पण मी हट्टी स्वभावामुळे या गोष्टींवर ठाम राहिलो.” ते पुढे म्हणाले की, “भगवान श्रीरामांचा जन्म भारतात नसून, नेपाळात झाला आहे. आमच्या शास्त्रांनुसारच ही गोष्ट खरी आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगाची विध्वंसाच्या दिशेने वाटचाल! 54 देशांच्या GDPइतकी संपत्ती फक्त शस्त्रांवर खर्च; शांतात अन् उपासमारीकडे दुर्लक्ष
राजीनामा दिल्यानंतर ओली कुठे गेले, याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की ते काठमांडूच्या उत्तरेस असलेल्या शिवपुरी सैन्य बॅरेकमध्ये आहेत. “मी देश सोडून गेलेलो नाही, उलटपक्षी अजूनही माझ्या भूमिकेवर ठाम आहे,” असे ओली यांनी स्पष्ट केले.
ओली यांनी स्वतःलाच “हट्टी व्यक्ती” असे संबोधले. त्यांनी सांगितले, “जर मी हट्टी नसतो, तर कदाचित खूप आधीच पराभूत झालो असतो. पण माझ्या या स्वभावामुळेच मी सोशल मीडिया कंपन्यांना आमचे नियम पाळण्यास भाग पाडले. मी आग्रह धरला की त्या कंपन्यांनी नेपाळात नोंदणी केली पाहिजे. त्याच हट्टीपणामुळेच मी भारताविरुद्ध आवाज उठवला.”
BREAKING: Nepal’s Deposed PM KP Sharma Oli accused India of engineering his ouster for challenging it on Lipulekh border and Lord Ram’s birthplace
In a letter, Oli claimed he lost power for opposing Ayodhya’s claim as Ram’s birthplace pic.twitter.com/iIGfcako7V
— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) September 10, 2025
credit : social media
ओली यांनी असेही म्हटले की, “पद आणि प्रतिष्ठा माझ्यासाठी महत्त्वाची नाही. जर मी संयुक्त राष्ट्रांना लिंपियाधुरासह नकाशा पाठवला नसता किंवा इतरांना माझ्यासाठी निर्णय घेऊ दिले असते, तर माझे आयुष्य खूप वेगळे असते. पण मी देशाच्या हितासाठीच ठाम राहिलो. सोप्या मार्गाने सत्ता मिळवणे मला शक्य होते, पण मला नेहमी कठीण आणि सत्याचा मार्ग निवडायचा होता.”
ओली यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भारत-नेपाळ संबंधांमध्ये आधीच तणाव निर्माण झाला आहे. विशेषतः लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरासारख्या संवेदनशील भूभागांवर त्यांचा दावा केल्यामुळे भारताने अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय भगवान रामाच्या जन्मस्थानाबाबत त्यांनी केलेले विधान हिंदू धर्मीयांमध्ये नेहमीच वाद निर्माण करत आले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Road to Success’ ला हास्याचा टच; B.Tech विद्यार्थ्याचा ‘असा’ हटके आणि विनोदी प्लॅन पाहून नेटिझन्स लोटपोट
राजीनाम्यानंतरही ओलींचा सूर आक्रमक राहिल्यामुळे नेपाळच्या राजकारणात नवे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जनरेशन-झेडचा दबाव, सोशल मीडिया मोहिमा आणि सततचे भारतविरोधी विधान यामुळे ओली यांची प्रतिमा एका हट्टी पण वादग्रस्त नेत्याची म्हणून अधिक बळकट होत चालली आहे.