युद्धामुळे लेबनॉनमध्ये गंबीर परिस्थिती
नवी दिल्ली: सध्या लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या इस्रायल-हिजबुल्ला संघर्षामुळे देशातील परिस्थिती अत्यंत भीषण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या युद्धामुळे गेल्या तीन आठवड्यांत सुमारे 1.2 दशलक्ष लोकांना आपले घर सोडून पळून जावे लागले आहे. यामध्ये 4 लाखांहून अधिक लाेकांचा समावेश आहे. युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन एजन्सीच्या उपकार्यकारी संचालक टेड चायबोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायल-हिजबुल्लाह, इस्त्रायल इराण युद्धामुळे देशातील लाखो मुले विस्थापित झाली आहेत.
लाखो मुलांची शाळा आणि शिक्षण खंडित
युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन एजन्सीच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, विस्थापित झालेल्या लाखो मुलांची शाळा आणि शिक्षण खंडित झाले आहे. यामुळे एक संपूर्ण पिढी गमावली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जगातील सर्वात असुरक्षित लोकांमध्ये पॅलेस्टिनी आणि सीरियन निर्वासितांसह अनेक लेबनीज मुलेही या संघर्षामुळे प्रभावित झाली आहेत. लेबनॉनमधील सार्वजनिक शाळांची इमारत नष्ट झाली आहे किंवा त्यांचा वापर आश्रयस्थान म्हणून केला जात आहे. त्यामुळे सुमारे 12 लाख मुले शिक्षणापासून वंचित झाली आहेत.
हे देखील वाचा- इस्त्रायलचा गाझातील मध्य शाळांवर पुन्हा एकदा हल्ला; 20 जणांना गमवावा लागला जीव
चायबोन यांनी बेरूतमधील शाळांना भेट दिली आणि मुलांच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली
तसेच काही खाजगी शाळा सुरू असल्या तरी सार्वजनिक शाळा प्रणाली युद्धामुळे पुर्णपणे कोलमंडली आहे. चायबोन यांनी बेरूतमधील शाळांना भेट दिली आणि मुलांच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, युद्धात आतापर्यंत 2,300 हून अधिक लोक मारले गेले आहेत, ज्यामध्ये सुमारे 75% मृत्यू गेल्या महिन्यात झाले आहेत. असे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. युद्धाच्या या तीन आठवड्यांत 100 हून अधिक मुले मरण पावली आहेत, तर 800 हून अधिक मुलं जखमी झाली आहेत.
वाढत्या हल्ल्यांमुळे लोकांचे जीवन अस्थिर झाले असून, युद्धग्रस्त भागातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. जगातील देशांनी या स्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण या संघर्षामुळे लेबनॉनमधील लाखो लोकांचे जीवन संकटात सापडले आहे. मुलांच्या शिक्षणाचा आणि सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. युनिसेफसह इतर जागतिक संस्थांनी युद्धग्रस्त मुलांसाठी तत्काळ मदत पुरवण्याचे आवाहन केले आहे.