अमेरिकेने इस्त्रायलला धोकादायक क्षस्त्रे पाठवण्याच्या तयारीत(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: सध्या इस्त्रायल-हिजबुल्लाह, इस्त्रायल-इराण मध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. यादरम्यान रशियाने इस्त्रायलला इराणावर हल्ला करण्याचे धाडस करू नये अशी धमकी दिली होती. दरम्यान या धमकीनंतर आता अमेरिका इस्त्रायलला लष्करी मदत करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेने इस्त्रायलला धोकादायक क्षस्त्रे पाठवली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने आपली प्रगत अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्त्रायच्या संरक्षणासाठी दिली आहेत. तर याच वेळी इराणने अमेरिकेला आपले शस्त्र इस्त्रायलपासून दूर ठेवावे असा इशारा दिला आहे.
अमेरिकन सैनिकही तैनात केले जातील
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिका लवकरच इस्रायलमध्ये टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स (THAAD) हवाई संरक्षण यंत्रणा तैनात करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही यंत्रणा इराणची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे रोखण्यास सक्षम आहे. याबाबत जारी केलेल्या एका निवेदनात पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी पॅट रायडर यांनी सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या आदेशानुसार संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी इस्रायलवर 13 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर रोजी इराणने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी मिशन सुरू करण्याच आले होते. निवेदनात सांगण्यात आले आहे की, THAAD बॅटरी आणि यूएस सैन्याची एक टीम देखील तयार करण्यात आली आहे.
हे देखील वाचा- हिजबुल्लाहचा इस्रायलवर ड्रोन हल्ला, लष्करी तळाला लक्ष्य; 4 जवान शहीद, 60 जखमी
‘अमेरिकेने इस्रायलपासून सैन्य दूर ठेवावे अन्यथा- इराण
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिका इस्त्रायला मदत करण्याच्या तयारीत असताना इराणने त्यांना यापासून दू राहावे असे म्हटले आहे. इराणने अमेरिकेला आपले सैन्य इस्रायलपासून दूर ठेवण्याचा इशारा दिला आहे. इस्त्रायल-इराण युद्धाच्या भीतीमुळे अमेरिका इस्त्रायलमध्ये THAAD युनिट तैनात करण्याच्या योजने इराणने अमेरिकेला इशारा दिला.
तर अमेरिकेने महटले आहे की, या युनिटची गुंतागुंतीची प्रक्रिया चालवण्यासाठी या ठिकाणी अमेरिकन सैनिकही तैनात केले जाणार आहेत. अशा स्थितीत इराण किंवा त्याच्या समर्थित संघटनांकडून इस्रायलवर हल्ला केल्यास अमेरिकन सैन्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. असे इराणच्या लष्करी सैन्याने म्हटले आहे. म्हणून आपल्या सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिकेने त्यांना इस्रायलमध्ये तैनात न करण्याची धमकी इराणने दिली आहे.
इराणने 180 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी इस्त्रायलवर 180 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र यातील अनेक क्षेपमास्त्रे इस्त्रायल आणि अमेरिकेने हानून पाडले. तर काही क्षेपणास्त्रांना रोखण्यात अपयशी ठरले. त्यानंतर इराणच्या या हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने मोठी कारवाई करण्याची धमकी दिली आहे. यामध्ये अमेरिका इस्त्रायच्या मदतीस असून इस्त्रायल जोरदार हल्ल्यांची तयारी करत आहे.
हे देखील वाचा- चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत; लष्करी हालचालींमुळे वाढले तणाव