दक्षिण कोरियात मोठा विमान अपघात; लँडिंग करताना विमान घसरले धावपट्टीवर, 28 जणांचा मृत्यू
सेऊल : दक्षिण कोरियात मोठा विमान अपघात झाला. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जेजू एअरलाइन्सचे हे विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवर घसरले आणि अपघातग्रस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानात एकूण 181 प्रवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते.
BREAKING: Video shows crash of Jeju Air Flight 2216 in South Korea. 181 people on board pic.twitter.com/9rQUC0Yxt8
— BNO News (@BNONews) December 29, 2024
दक्षिण कोरियातील एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाले, ज्यामध्ये 28 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेजू एअरचे हे विमान थायलंडहून परतत होते. दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर उतरताना विमान घसरले आणि भिंतीवर आदळले. भिंतीवर आदळताच विमानाने पेट घेतला. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
थायलंडहून परतत होते विमान
मिळालेल्या माहितीनुसार, जेजू एअरचे हे विमान थायलंडहून परतत होते. दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर उतरताना विमान घसरले आणि भिंतीवर आदळले. भिंतीवर आदळताच विमानाने पेट घेतला. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
ढिगाऱ्याखालून दोन जणांना जिवंत काढले बाहेर
प्राथमिक माहितीनुसार, लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लागलेली आग जवळपास विझवण्यात आली आहे. सध्या बचावकार्य सुरूच आहे. विमानाच्या ढिगाऱ्यातून प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. सध्या बचाव मोहिमेदरम्यान दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. त्यात एक प्रवासी आणि एक चालक आहे.
लँडिंगदरम्यान झाला अपघात
जेजू एअरचे विमान 175 प्रवासी आणि सहा फ्लाइट अटेंडंट्स घेऊन बँकॉक, थायलंड येथून परतत असताना लँडिंग दरम्यान अपघात झाला. बचावकार्य सुरू असताना एक व्यक्ती जिवंत सापडली आहे. विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की, आपत्कालीन सेवा विमानाच्या मागील भागातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघाताचे कारण अस्पष्ट आहे. मात्र, पक्ष्यांच्या धडकेमुळे लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याचे प्राथमिकरित्या दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे.