अमेरिकेत सरकारी नोकरशाहीत मोठ्या प्रमाणात कपात; देशाच्या विकासासाठी मस्कच्या पद्धतीचा अवलंब
वॉश्गिंटन: राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनामध्ये अनेक पदांच्या नियुक्त्या केल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिस्यन्सी या पदावर इलॉन मस्क आणि भारतीय वंशाचे उद्योजक रामास्वामी यांची नियुक्ती केली. आता त्यानंतर विवेक रामास्वामी यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांनी इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली या पद्धतीचा अवलंब करीत सरकारी नोकरशाहीत सुधारणा करण्याची योजना जाहीर केली आहे.
देशाच्या प्रगतीसाठी ही कपात गरजेची
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक रामास्वीमी यांनी फ्लोरिडामधील एका कार्यक्रमात सांगितले की, सरकारी नोकऱ्यांमधील मोठ्या प्रमाणावरील कपात देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील (DoGE) डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी च्या माध्यमातून रामास्वामी आणि मस्क यांनी सरकारी विभागांमधील खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. रामास्वामी यांनी स्पष्ट केले की, जास्त नोकरशाहीमुळे नाविन्याला आळा बसतो आणि सरकारी खर्च वाढतो.
DoGE अंतर्गत भरती प्रक्रियेसाठी बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रम करणाऱ्या व्यक्तींचा शोध
एफडीए आणि न्यूक्लियर रेग्युलेटरी कमिशन यांसारख्या संस्था निर्णय प्रक्रियेत अडथळा आणून देशाच्या विकासाला ते आळा बसत आहे. त्यामुळे या यंत्रणांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज आहे. DoGE अंतर्गत भरती प्रक्रियेसाठी मस्क आणि रामास्वामी उच्च बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. मात्र, या पदांसाठी कोणतेही वेतन दिले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय इलॉन मस्कने नमूद केले की, या नोकऱ्या कंटाळवाण्या असतील आणि त्यात अनेक शत्रू तयार होतील, पण यामुळे देशाला मोठा फायदा होईल.
नवीन मॅनहॅटन प्रकल्प
रामास्वामी यांचे मत आहे की, अमेरिकेला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी सरकारी नोकरशाहीत आमूलाग्र सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यांचा विश्वास आहे की, अमेरिकेत एक नवीन युग सुरू होत आहे. यामुळे येथे केवळ पात्र व्यक्तींनाच नोकरी मिळेल. त्यांनी ‘नवीन मॅनहॅटन प्रकल्पा’च्या माध्यमातून प्रतिभावान व्यक्तींना एकत्र करून नाविन्यपूर्ण कार्ये करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. DoGE च्या कामकाजाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मस्क आणि रामास्वामी दर आठवड्याला लाईव्हस्ट्रीमद्वारे संवाद साधणार आहेत. अमेरिकेच्या प्रगतीसाठी ही धोरणे निर्णायक ठरतील, असे रामास्वामी यांचे म्हणणे आहे.