फोटो सौजन्य: सोशल मीडिया
मास्को: रशियाने युक्रेनमार्गे युरोपीय देशांना होणाऱ्या नैसर्गिक गॅस पुरवठा स्थगित करणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे युरोपातील उर्जा संकंट वाढण्याची शक्यता आहे. रशियाचा युरोपला गॅस पुरवठा करण्याचा हा सर्वात जुना मार्ग असून तो सोव्हिएत कालापासून कार्यरत आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, हा मार्ग 2024 च्या अखेरिस पूर्णत: बंद करण्यात येणार असल्याचे रशियाने म्हटले आहे. यामुळे सर्व युरोपीय देशांमध्ये खळबळ उडाली आहे.
2025 पासून गॅस पुरवठा बंद होणार
यामुळे युरोपीय देशांना गॅस पुरवठ्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. यावर युक्रेनने स्पष्ट केले आहे की, रशियन सरकारी मालकीच्या कंपन्या Gazprom (GAZP.MM) गॅस संक्रमण वाढवणार नाहीत. रशियानेही युक्रेनमार्गे होणारा गॅस पुरवठा 2025 पासून पूर्णतः थांबवण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे युरोपातील गॅसच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे कीवने युद्धादरम्यान मास्कोशी नवीन अटींवर तडजोड करण्यास नकार दिला होता.
या युरोपीय देशांवर होणार परिणाम
युरोपीय देशांना मिळणार गॅस पुरवठा तुलनेने कमी आहे. युक्रेनमार्गे सध्या रशिया युरोपला दरवर्षी सुमारे 15 अब्ज घनमीटर गॅस पुरवतो. हा पुरवठा 2018-19 मध्ये मिळणार्या रसियन वायूपेक्षा 8% टक्के कमी आहे. याशिवाय, रशियाने युरोपीयन रॅस मार्केटमध्ये 35% पर्यंत आपला हिस्सा तयार केला होता. मात्र, 2022 मध्ये रशियावरली आक्रमणानंतर हा पुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला होता.
हा पुरवठा युरोपातील एकूण गॅस वापराच्या तुलनेने कमी असला तरी त्याचा मोठा परिणाम होणार आहे. विशेषतः ऑस्ट्रिया, हंगेरी आणि स्लोव्हाकियासारख्या देशांवर याचा गंभीर परिणाम होईल. हंगेरीला मिळणाऱ्या गॅसपैकी दोन तृतीयांश गॅस रशियाकडूनच येतो, तर स्लोव्हाकियालाही 60% गॅस रशियाकडून मिळतो. यामुळे हंगेरी, ऑस्ट्रिया आणि स्लोव्हाकियावर अनेक परिणाम होण्याची शक्यता आहे.
नैसर्गिक गॅस पुरवठा बंदीमुळे होणारे परिणाम
युरोपात वाढत्या गॅस दरांची चिंता
रशियाने युक्रेनमार्गे गॅस पुरवठा कमी केल्यानंतर 2022 मध्ये युरोपात गॅस दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते. जर हा मार्ग पूर्णपण बंद झाला, तर गॅसच्या दरांमध्ये पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे उद्योगधंदे आणि घरगुती वापरकर्ते दोघेही अडचणीत येऊ शकतात.
युरोपातील विभागीय मतभेद
फ्रान्स आणि जर्मनीसारखे काही देश रशियन गॅसवरून अवलंबित्व कमी करत आहेत. परंतु ऑस्ट्रिया, हंगेरी आणि स्लोव्हाकियासारखे देश अजूनही रशियन गॅसवर अवलंबून आहेत. रशियन गॅस तुलनेने स्वस्त असल्याने या देशांनी पर्यायी उपाययोजना केल्या नाहीत. मात्र गॅस पुरवठा बंद झाल्यास अनेक समस्या उत्पन्न होऊ शकतात. युक्रेनमार्गे गॅस पुरवठा बंद झाल्यास युरोपाला मोठ्या ऊर्जा संकटाला सामोरे जावे लागणार आहे.