Israel Iran War : इस्रायलचा शत्रूच्या घरात घुसून मोठा वार! सर्वोच्च नेत्याच्या विमानाचे केले तुकडे-तुकडे, आता काय करणार इराण? (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Benjamin Netanyhu जिवंत की मृत? ‘कॉफी शॉप’ मधील व्हिडिओ Deepfake असल्याचा एआय ग्रोकचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हवाई दलाने इराणची राजधानी तेहरानच्या मुख्य विमानतळ मेहराबादवर भीषण प्रहार केला आहे. या हल्ल्यात इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मालकीचे आणि त्यांच्या वापरासाठी असलेले ‘स्ट्रॅटेजिक’ विमान पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. यामुळे इराणच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले असून जगभरात खळबळ माजली आहे.
इस्रायलच्या संरक्षण दलाने, या कारवाईची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन दिले. या माहितीनुसार, इस्रायली सैन्याने अत्यंत अचूक आणि सुनियोजिपणे इराणच्या मुख्य विमानतळ मेहराबादवरला लक्ष्य केले. मेहराबाद हे इराणचे लष्करी आणि राजनैतिक हालचालींचे मुख्य केंद्र मानले जाते. अशा ठिकाणी घुसून इस्रायलच्या हल्ल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, इस्रायले विमानतळावर घुसून खामेनेईंच्या ‘एक्सिस ऑफ रेसिस्टेंस’ (इराण समर्थक गट) सोबत गुप्त संवाद साधण्यासाठी आणि लष्करी मदत पुरवण्यासाठी वापरले जाणारे विमानाचे तुकडे-तुकडे केले आहे. यामुळे इराणच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान इराणची मोठी रणनीतिक मालमत्ता मानली जाते. या विमानाद्वारे इराण आपल्या प्रादेशिक सहयोगी संघटनांशी संपर्क साधत असे मात्र आता हे विमान उद्धस्त झाल्याने इराणला मोठा धक्का बसला आहे. तेहरानच्या मध्यभागी असलेल्या विमानतळावर हल्ला होणे इराणसाठी मोठा अपामानजनक ठरला आहे. माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर इराणला हा सर्वात दुसरा मोठा धक्का बसला आहे. या कारवाईनंतर इस्रायलने अधिकृत निवदेन जारी करत इराणला खुले आव्हानं दिले आहे.
❌ ارتش اسرائیل هواپیمای رهبر رژیم تروریستی ایران را در فرودگاه «مهرآباد» تهران منهدم کرد. ⭕️ این هواپیما توسط علی خامنهای، رهبر رژیم تروریستی ایران، و دیگر مقامات ارشد این رژیم و همچنین عناصر نیروهای مسلح ایران برای پیشبرد خریدهای نظامی و مدیریت ارتباطات با کشورهای محور از… pic.twitter.com/BcCtdzb70p — ارتش دفاعی اسرائیل | IDF Farsi (@IDFFarsi) March 16, 2026
Ans: इस्रायलने दावा केला आहे की त्यांनी तेहरानमधील मेहराबाद विमानतळावर एअर स्ट्राइक करून इराणच्या सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या वापरातील एक विशेष विमान नष्ट केले आहे.
Ans: इस्रायलच्या या हल्ल्यामुळे इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत मोठ्या संघर्षाची भीती व्यक्त केली जात आहे.






