इलॉन मस्क (Elon Musk) चालवणारी इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक कंपनी, कर्मचाऱ्यांच्या टाळेबंदीची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार, टेस्ला जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढू (Tesla Lay Off) शकते. कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये खर्च कमी करण्याबाबत बोलले आहे. “वाढीच्या पुढील टप्प्यासाठी” खर्च कमी करणे आवश्यक असल्याचं कर्मचाऱ्यांना ईमेलमध्ये म्हणण्यात आलं आहे.
[read_also content=”‘माझ्या भावाला सोडून द्या’ राखी सावंतने हल्लेखोरांसमोर रडत रडत केली विनवणी, व्हिडीओ व्हायरल! https://www.navarashtra.com/movies/rakhi-sawant-came-out-in-support-of-salman-khan-regarding-unfortunate-incident-nrps-524242.html”]
कंपनीने या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास 14,000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील. सीईओ मस्क यांनी ईमेलमध्ये लिहिले आहे की, “आम्ही कंपनीच्या वाढीच्या पुढील टप्प्यासाठी तयार करत असताना, खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कंपनीच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही एक सखोल आयोजन केले आहे. संस्थेचे पुनरावलोकन केले आणि जागतिक स्तरावर आमचे कर्मचारी 10% पेक्षा जास्त कमी करण्याचा कठीण निर्णय घेतला.”
टेस्लाने ऑटो डिलिव्हरीमध्ये घट नोंदवल्यानंतर काही दिवसांनी ही घोषणा झाली. टेस्लाने मागणी वाढवण्यासाठी आपल्या कारच्या किमतीही कमी केल्या आहेत, मात्र त्याचा परिणाम सध्या दिसत नाही आणि विक्रीत घट होत आहे.
टेक अब्जाधीश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या महिन्यात त्यांच्या भारत भेटीदरम्यान भेटणार आहेत. इलॉन मस्क 22 एप्रिलनंतर नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत. या वेळी, मस्क त्याच्या गुंतवणूक योजना आणि देशात $2-3 अब्ज किमतीचा उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याची घोषणा करू शकतात. अहवालानुसार, गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू हे ईव्ही आणि निर्यात वाहनांचे उत्पादन सुरू करण्यास टेस्लाचे प्राधान्य आहे.