
NASA's Hubble captures historic asteroid collision in the Fomalhaut star system
NASA Hubble Fomalhaut asteroid collision 2025 : अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात नासाने (NASA) आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि दुर्मिळ शोध लावला आहे. आपल्या सूर्यमालेपासून सुमारे २५ प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘फोमलहॉट’ (Fomalhaut) नावाच्या ताऱ्याभोवती दोन महाकाय अवकाशीय वस्तूंची (लघुग्रह) भयानक टक्कर झाली आहे. या टक्करीमुळे विश्वात एक शक्तिशाली स्फोट झाला असून, नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने या विद्ध्वंसाचे फोटो जगासमोर आणले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, बाह्य सूर्यमालेत अशी टक्कर पाहण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथील प्रमुख संशोधक पॉल कलास यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावर प्रकाश टाकला आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, त्यांनी फोमलहॉट ताऱ्याभोवती एका प्रकाशाच्या बिंदूचे निरीक्षण केले. सुरुवातीला तो एखादा नवीन ग्रह असावा असे वाटले होते (ज्याला ‘फोमलहॉट बी’ नाव दिले गेले होते), परंतु नंतर हबलने जे पाहिले त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तो ग्रह नसून दोन प्रचंड मोठ्या खडकांच्या टक्करीतून निर्माण झालेला धुळीचा आणि ढिगाऱ्याचा ढग (Dust Cloud) होता. हा ढग इतका मोठा आहे की तो आज आपण सूर्यमालेत पाहतो त्या कोणत्याही गोष्टीपेक्षा वेगळा आहे.
In a historical milestone, Hubble has spotted asteroids colliding ☄️ at the nearby star Fomalhaut. In 2008, scientists used Hubble to discover a candidate planet around Fomalhaut, an object called Fomalhaut b. While searching for Fomalhaut b in recent Hubble observations,… pic.twitter.com/MTMGzKF9yq — HUBBLE (@HUBBLE_space) December 19, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Alina Kabaeva : Putin प्रेमात पडले! ‘Girlfriend कोण?’ विचारताच रशियन राष्ट्राध्यक्ष चक्क लाजले; पाहा ‘तो’ VIRAL VIDEO
सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा आपली सूर्यमाला तयार होत होती, तेव्हा परिस्थिती अत्यंत अशांत होती. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, त्या काळात पृथ्वी, चंद्र आणि इतर ग्रहांवर अशाच प्रकारे लघुग्रह आणि धूमकेतूंची टक्कर होऊन त्यांचे अवशेष पडले होते. फोमलहॉट हा तारा आपल्या सूर्यापेक्षा खूप तरुण आहे (सुमारे ४४ कोटी वर्षे जुना). त्यामुळे तिथे घडणाऱ्या या घटना म्हणजे जणू आपण आपल्याच सूर्यमालेच्या इतिहासाची ‘रिवाइंड’ केलेली फिल्म पाहत आहोत, असे शास्त्रज्ञांना वाटते.
Notice anything different about me? 👀 This @NASAHubble picture of the galaxy NGC 4388 reveals something not previously visible in previous images of it—a plume of gas reaching out towards the bottom-right corner of the image. Learn more: https://t.co/y0jXxkON5u pic.twitter.com/G09qktHE4a — NASA (@NASA) December 20, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे
संशोधक पॉल कलास म्हणतात, “हे खरोखरच आश्चर्यकारक आहे! आपण नुकतेच दोन मोठ्या वस्तू आणि एका महाकाय ढिगाऱ्याच्या ढगामधील टक्कर पाहिली आहे. हे दृश्य हबलच्या पूर्वीच्या कोणत्याही प्रतिमांमध्ये नव्हते, याचा अर्थ ही घटना नुकतीच घडली आहे.” या टक्करीमुळे निर्माण झालेला ढिगारा अवकाशात पसरला असून, तो ताऱ्याच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे. यामुळेच तो टेलिस्कोपला एखाद्या ग्रहासारखा चमकताना दिसला. नासाने शेअर केलेला हा फोटो केवळ एक प्रतिमा नसून, ग्रहांच्या निर्मितीची प्रक्रिया कशी चालते, हे सांगणारा जिवंत पुरावा आहे. या शोधामुळे भविष्यात इतर ग्रहमंडळांचा अभ्यास करण्याची नवी दिशा शास्त्रज्ञांना मिळाली आहे.
Ans: हबल टेलिस्कोपने फोमलहॉट (Fomalhaut) या ताऱ्याभोवती दोन महाकाय लघुग्रहांची (Planetesimals) भीषण टक्कर आणि त्यातून निर्माण झालेला प्रचंड ढिगाऱ्याचा ढग शोधला आहे.
Ans: हा तारा पृथ्वीपासून सुमारे २५ प्रकाशवर्षे दूर आहे आणि तो आपल्या सूर्यापेक्षा तरुण आहे.
Ans: या शोधामुळे ग्रहांच्या निर्मितीची प्रक्रिया आणि आपल्या सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील घडामोडी समजून घेण्यास मदत होणार आहे.