Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Space War 2026: रशियाची गुप्तचर याने युरोपीय उपग्रहांच्या मानगुटीवर; संपूर्ण जगाला ब्लॅकआऊटचा धोका, स्टारलिंकवर अणुहल्ल्याची धमकी

Russian Spy Spacecraft: युक्रेन-रशिया युद्ध आता अवकाशात पोहोचले आहे. युरोपियन उपग्रहांना रोखणारे रशियन गुप्तचर अंतराळयान आणि स्टारलिंक नेटवर्कवर अणुहल्ल्याची धमकी यामुळे जगाला धक्का बसला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 06, 2026 | 12:30 PM
russian spy satellites luch 2 target european infrastructure nuclear threat starlink

russian spy satellites luch 2 target european infrastructure nuclear threat starlink

Follow Us
Close
Follow Us:
  • अंतराळात रशियन हेरगिरी
  • अणुयुद्धाची छटा
  • हायब्रीड वॉरफेअर

Russian spy satellite Luch-2 targets 2026 : युक्रेन (Ukraine) आणि रशियामधील (Russia)युद्ध आता पृथ्वीच्या सीमा ओलांडून थेट अवकाशात (Space) पोहोचले आहे. रशियाची गुप्तचर अंतराळयाने (Spy Spacecraft) युरोपीय देशांच्या महत्त्वाच्या उपग्रहांना लक्ष्य करत असल्याचा धक्कादायक अहवाल ‘फायनान्शिअल टाइम्स’ आणि नाटो (NATO) गुप्तचर संस्थांनी प्रसिद्ध केला आहे. या प्रकारामुळे केवळ डेटा चोरीचा धोका नसून, जागतिक दळणवळण व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

‘लुच-१’ आणि ‘लुच-२’ चा अंतराळातील थरार

रशियाची Luch-1 आणि Luch-2 ही दोन अंतराळयाने सध्या युरोपच्या १७ हून अधिक महत्त्वाच्या उपग्रहांच्या अगदी जवळ घिरट्या घालत आहेत. फेब्रुवारी २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, लुच-२ हे ‘Intelsat 39’ सारख्या मोठ्या उपग्रहाजवळ तळ ठोकून आहे. ही याने अशा प्रकारे स्वतःला ‘पार्क’ करतात की, उपग्रह आणि पृथ्वीवरील बेस स्टेशन यांच्यातील डेटा सिग्नल ते सहजपणे रोखू शकतात (Intercept). यामुळे युरोप, आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील संवेदनशील सरकारी आणि लष्करी संदेश रशियाच्या हाती लागण्याची दाट शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Treaty: करार नाही, आता प्रहार! ट्रम्पनी रशियाचा ‘अण्वस्त्र’ प्रस्ताव पायदळी तुडवला; लवकरच होणार अणुयुद्धास प्रारंभ

जुन्या उपग्रहांची ‘एन्क्रिप्शन’ कमजोरी

चिंतेची बाब म्हणजे, अनेक युरोपीय उपग्रह जुन्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यांमध्ये आधुनिक ‘एन्क्रिप्शन’ (Encryption) सुरक्षा नाही. यामुळे रशियन हॅकर्स या उपग्रहांच्या कमांड सिस्टममध्ये शिरकाव करून त्यांचा मार्ग बदलू शकतात किंवा त्यांना दुसऱ्या उपग्रहावर धडकवून नष्ट करू शकतात. जर्मन अंतराळ कमांडचे प्रमुख मेजर जनरल मायकेल ट्रॉट यांनी याला रशियाचे “हायब्रीड युद्ध” संबोधले आहे, ज्याचा उद्देश पाश्चात्य देशांची संप्रेषण व्यवस्था मुळापासून उपटून टाकणे हा आहे.

FT: Russian satellites Luch-1 and Luch-2 have been intercepting and spying on European satellites — exposing how Moscow can monitor, disrupt, or even hijack systems that power Europe’s communications, TV, and government links. 1/ pic.twitter.com/n1QlXkQ2FO — Tymofiy Mylovanov (@Mylovanov) February 4, 2026

credit – social media and Twitter

एलोन मस्कच्या स्टारलिंकवर अणुहल्ल्याचे सावट?

युक्रेनला युद्धाच्या मैदानात इंटरनेट पुरवणारे एलोन मस्कचे Starlink नेटवर्क रशियाच्या डोळ्यात खुपत आहे. रशियन सरकारी टेलिव्हिजनवर व्लादिमीर सोलोव्योव्ह यांनी थेट सुचवले आहे की, रशियाने अवकाशात अणुस्फोट करून स्टारलिंक उपग्रहांचा नायनाट करावा. शास्त्रज्ञांच्या मते, अवकाशातील अणुस्फोटामुळे निर्माण होणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स (EMP) हजारो उपग्रहांना एका क्षणात निकामी करू शकते. यामुळे मानवी प्रगती अनेक दशके मागे जाऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Oman Talks: आखाती देशांचा श्वास रोखला! ओमानमध्ये आज अमेरिका-इराण आमनेसामने; चर्चा फिसकटल्यास मध्य पूर्वेत युद्ध अटळ

नाटो आणि युरोपचा अलर्ट

या धोक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटन आणि फ्रान्सने आपल्या राष्ट्रीय संरक्षण धोरणात ‘अंतराळ सुरक्षा’ या विषयाला सर्वोच्च प्राथमिकता दिली आहे. रशिया सध्या केवळ हेरगिरी करत नसून, ‘सॅटेलाईट किलर’ शस्त्रांची चाचणी करत असल्याचेही समोर आले आहे. जर ही परिस्थिती निवळली नाही, तर भविष्यात इंटरनेट, जीपीएस आणि टेलिव्हिजन सेवा कायमच्या बंद होऊ शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लुच-१ आणि लुच-२ (Luch satellites) म्हणजे काय?

    Ans: ही रशियाची 'इन्स्पेक्टर' किंवा गुप्तचर अंतराळयाने आहेत, जी दुसऱ्या उपग्रहांच्या जवळ जाऊन त्यांचे सिग्नल्स चोरण्यासाठी ओळखली जातात.

  • Que: स्टारलिंकवर अणुहल्ल्याचा धोका किती खरा आहे?

    Ans: रशियन सरकारी माध्यमांनी तशी धमकी दिली असली, तरी असा स्फोट रशियाच्या स्वतःच्या उपग्रहांनाही हानी पोहोचवू शकतो, त्यामुळे हा एक मोठा 'धोरणात्मक दबाव' मानला जात आहे.

  • Que: सामान्य माणसावर याचा काय परिणाम होईल?

    Ans: जर रशियाने उपग्रह नष्ट केले, तर इंटरनेट, बँकिंग, जीपीएस आणि आंतरराष्ट्रीय संपर्क व्यवस्था कोलमडू शकते.

Web Title: Russian spy satellites luch 2 target european infrastructure nuclear threat starlink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Space News
  • World War 3

संबंधित बातम्या

Nuclear Talks: ‘इराण झुकणार नाही!’ मस्कतमध्ये अणु चर्चेचा महासंग्राम; अराघची यांचा अमेरिकेला निर्भय शब्दांतला खरमरीत इशारा
1

Nuclear Talks: ‘इराण झुकणार नाही!’ मस्कतमध्ये अणु चर्चेचा महासंग्राम; अराघची यांचा अमेरिकेला निर्भय शब्दांतला खरमरीत इशारा

Nuclear Treaty: करार नाही, आता प्रहार! ट्रम्पनी रशियाचा ‘अण्वस्त्र’ प्रस्ताव पायदळी तुडवला; लवकरच होणार अणुयुद्धास प्रारंभ
2

Nuclear Treaty: करार नाही, आता प्रहार! ट्रम्पनी रशियाचा ‘अण्वस्त्र’ प्रस्ताव पायदळी तुडवला; लवकरच होणार अणुयुद्धास प्रारंभ

US-Iran Oman Talks: आखाती देशांचा श्वास रोखला! ओमानमध्ये आज अमेरिका-इराण आमनेसामने; चर्चा फिसकटल्यास मध्य पूर्वेत युद्ध अटळ
3

US-Iran Oman Talks: आखाती देशांचा श्वास रोखला! ओमानमध्ये आज अमेरिका-इराण आमनेसामने; चर्चा फिसकटल्यास मध्य पूर्वेत युद्ध अटळ

World War 3: जगाचे दिवस भरले! Israel ने थेट…; मृत्यूच्या तांडवात तब्बल 19 जण ठार
4

World War 3: जगाचे दिवस भरले! Israel ने थेट…; मृत्यूच्या तांडवात तब्बल 19 जण ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.