Nepal Gen Z Protests Update Former PM KP Sharma Oli Denies Fleeing Country Vows Political Fight
Nepal News in marathi : काठमांडू : नेपाळच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. नेपाळमध्ये जनरेशन-झेडच्या आंदोलनांदरम्यान (Nepal Protest) ओली सरकारला पाडण्यात आले होते. माजी सरकारच्या पंतप्रधान ओली आणि मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान अनेक दिवसानंतर ओली यांना २७ सप्टेंबर रोजी नेपाळमध्ये पाहिले गेले. दरम्यान याच वेळी नेपाळच्या न्यायिक आयोगाने कठोर निर्णय घेत माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांना काठमांडू सोडण्यास बंदी घातली. तसेच त्यांचे पासपोर्टही रद्द करण्यात आले. यामुळे ओली यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नेपाळचे माजी पंतप्रधान केपी ओली शर्मा (KP Oli Sharma) यांनी अंतरिम सरकारवर निशाना साधत आपण पळून जात नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी अंतरिम सुरक्षा आणि अधिकृत विशेषाधिकारचा गैरफायदा घेण्याचा आरोप ओली यांनी केला आहे. २७ सप्टेंबर रोजी ओली युवा संघटनेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी त्यांनी युवा संघ नेपाळला संबोधित करताना अंतिरम सरकारवर हे आरोप केले. तसेच त्यांनी आपण देश साोडून जात नसल्याचे आणि राजकीय लढा सुरुच ठेवण्याचे म्हटले आहे. ओली सरकार यांनी कार्की यांचे सरकार अवैध असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, अंतरिम सरकार जनमतावर स्थापन झालेले नाही, तर आंदोलनातील तोडफोड, जाळपोळ आणि लोकांच्या मृत्यूवर झाले आहे.
तसेच त्यांनी सरकारला प्रश्न केला की, तुम्हाला वाटते का की आम्ही देश सोडून पळून जाऊ? आम्ही आमचा देश या सरकारच्या हाती देऊन परदेशात पळून जाऊ? नाही आम्हाला आमचा देश पुन्हा उभारायचा आहे. याला पुन्हा एका लोकशाही संवैधानिक बनवायचे आहे, असे ओली यांनी म्हटले.
केपी ओली यांनी विशेष करुन सुशीला कार्की (Sushila Karki) यांना टार्गेट केले. त्यांनी त्यांच्यावर पुन्हा हल्ला होण्याची भीती व्यक्त करत सरकार काय करत आहे? ते फक्त पाहत आहे का? असा प्रश्न केला. तसेच त्यांच्या पासपोर्ट रद्द करण्यावरही त्यांनी टीका केली. त्यांनी म्हटले की, सुशीला कार्की राजकीय विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य करत आहे. यामुळे नेपाळ धोक्यात आला आहे. ओली यांच्या या आरोपांमुळे नेपाळमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहे.
नेपाळच्या माजी पंतप्रधान ओली यांनी सध्याच्या अंतरिम सरकारवर काय आरोप केले?
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांनी अंतरिम सरकारवर सुरक्षा आणि अधिकृत विशेषाधिकारचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप केला आहे.
ओली यांनी अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांच्यावर काय आरोप केले?
ओली शर्मा यांनी अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की राजकीय विरोधकांना लक्ष करुन नेपाळला धोक्यात घालत असल्याचे म्हटले
KP Oli Sharma : हिंसाचारानंतर पहिल्यांदाच नेपाळमध्ये दिसले केपी ओली; केले अनेक धक्कादायक खुलासे