Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळच्या GEN-Z ला आले यश! सोशल मीडियाचे ‘ते’ वादग्रस्त विधेयक अखेर मागे

Nepal Social Media Retraction : नेपाळच्या जनरेशन झेडच्या तरुणांना अखेर विजय मिळाला आहे. नेपाळच्या सध्याच्या अंतरिम सरकारने सोशल मीडियावरील बंदीचे वादग्रस्त विधेयक मागे घेतले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 04, 2026 | 12:20 PM
Nepal social media bill withdrawn

Nepal social media bill withdrawn

Follow Us
Follow Us:
  • नेपाळच्या अंतिरम सरकारचा मोठा निर्णय
  • सोशल मीडियावरील वादग्रस्त विधेयक संसेदतून घेतले मागे
  • सोशल मीडियावरील बंदीमुळे जनरेशन झेडने केले होते हिंसक आंदोलन
Nepal Social Media Bill Withdrawn : काठमांडू : नेपाळच्या (Nepal) जनरेशन झेडच्या तरुणांचा मोठा विजय झाला आहे. नेपाळच्या सध्याच्या अंतरिम सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सुशीला कार्की (Sushila Karki) यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सुरक्षितेकरिता सोशल मीडियावरील वादग्रस्त विधेय मागे घेतले आहे. यामुळे नेपाळच्या जनरेशन झेडच्या तरुणांना दिलासा मिळाला आहे. आता नेपाळमध्ये कोणत्या प्रकारच्या सोशल मीडियावर बंदी नसणार आहे.

सोशल मीडियावरील बंदीने हजारो Gen Z चा चढला पारा; नेपाळमध्ये संचार बंदी लागू

काय आहे विधेयक ?

नेपाळच्या माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली (K.P. Sharma Oli) यांच्या सरकाने सोशल मीडियावर बंदीसाठी संसदेत एक वादग्रस्त विधान सादर केले होते. या विधयेकता फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसह एकूण २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेपाळमध्ये बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. ओली शर्मा सरकारच्या या निर्णयामुळे नेपाळच्या Gen Z तरुणांमध्ये तीव्र संताप उफळला होता. ओली शर्मा सरकार जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार असल्याचे नेपाळच्या तरुणांनी आरोप केला होता.

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन 

माजी सरकारच्या या निर्णयानंतर नेपाळमधील हजारो तरुणरस्त्यावर उतरले होते. सोशल मीडियावरील बंदीविरोधात तरुणांनी आवाज उठवला होता. माजी सरकारने या आंदोलनाला रोखण्यासाठी बळाचा वापर केला होता. यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र झाले होते. सुरुवातील हे आंदोलन सोशल मीडियावरील बंदीपूरते मर्यादित होते. परंतु सुरक्षा दलांच्या गोळीबारामुळे हे आंदोलन अधिक हिंसक झाले आणि सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात घोषणाबाजी होऊ लागली. या हिंसक आंदोलनात तरुणांनी काठमांडूतील संसद भवन पेटवून दिले होते. आंदोलकांनी अनेक मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला केला होता. नेपाळमध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती. नेपाळचे माजी पंतप्रधान ओली शर्मा आणि त्यांच्या सरकारमधील नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन तिथून पळ काढला होता.

अंतरिम सरकारची स्थापना

यानंतर नेपाळच्या लष्कराने शांतता प्रस्थापित करण्यासाठी देशात कर्फ्यू लागू केला होता. कर्फ्यू लागू झाल्यानंतर नेपाळच्या अंतरिम सरकारची स्थापन झाली. नेपाळच्या माजी महिला न्यायाधीश सुशीला कार्की यांनी १२ सप्टेंबर रोजी २०२५ रोजी पदाची शपथ घेतली. सध्या त्यांच्या नेतृत्वाखालीच अंतरिम सरकारने सोशल मीडियावरील वादग्रस्त विधेयक संसदेतून माघारी घेतले आहे. सरकार विधेयकावर पुनर्विचार करणार असून लोकशाहीसाठी हे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Nepal Protests : बांगलादेशनंतर आता नेपाळमध्ये होणार सत्तापालट! आंदोलकांच्या काय आहेत मागण्या?

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळच्या अंतरिम सरकारने कोणता निर्णय घेतला आहे?

    Ans: नेपाळच्या अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या सरकारने संसदेत सादर केलेल सोशव मीडिया बंदीवरील वादग्रस्त विधेयक मागे घेतले आहे.

  • Que: नेपाळच्या अंतरिम सरकारच्या या निर्णयाचा काय परिणाम होईल?

    Ans: नेपाळच्या अंतरिम सरकारच्या सोशल मीडियावरील विधेयक मागे घेण्यामुळे लोकांचा सरकार आणि लोकशाहीवरील विश्वास वाढेल. तसेच भविष्यात सरकार आणि जनतेत पारदर्शकता निर्माण होईल.

Web Title: Nepals gen z wins controversial social media bill finally withdrawn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • KP Sharma Oli
  • Nepal News
  • Nepal Violence
  • social media ban
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.