
nepal baitadi wedding bus accident 8 dead 45 injured rescue updates
Baitadi bus crash wedding party 2026 : एकीकडे लग्नाची गाणी, आनंदाचे वातावरण आणि वऱ्हाड्यांची लगबग सुरू असतानाच नियतीने क्रूर घाला घातला आहे. नेपाळच्या (Nepal) बैताडी जिल्ह्यात गुरुवारी रात्री एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. पुरचौडी नगरपालिकेत रात्री ८ च्या सुमारास वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी एक बस नियंत्रणाबाहेर जाऊन खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस लग्नाची मिरवणूक घेऊन निघाली होती. बसमध्ये सुमारे ६० वऱ्हाडी होते. वधू-वर दुसऱ्या एका खाजगी वाहनातून पुढे निघून गेल्यामुळे ते या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या मागून येणाऱ्या बसचा अचानक ब्रेक निकामी झाला किंवा चालकाचे नियंत्रण सुटले, ज्यामुळे ही बस थेट खोल दरीत कोसळली. काळोख आणि दुर्गम भाग असल्यामुळे मदतकार्यात सुरुवातीला अनेक अडथळे आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : End FGM : बापरे! अंगावर काटा आणणारी प्रथा; पाहा काय आहे ‘महिला जननेंद्रियांबद्दलची विकृती’ आणि का आवश्यक आहे त्याविरुद्ध लढा
अपघाताची माहिती मिळताच बैताडीचे जिल्हा दंडाधिकारी कृष्णा थापा यांच्या मार्गदर्शनाखाली नेपाळ सैन्य, नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही जीवाची पर्वा न करता जखमींना बसच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. जखमींपैकी १६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उच्च सुविधा असलेल्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींवर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
Eight killed as wedding party bus crashes in Baitadi The bus plunged about 200 metres off the road. Rescue efforts continue at the site, police said.https://t.co/5TNjLg1RyZ — The Kathmandu Post (@kathmandupost) February 5, 2026
credit – social media and Twitter
बैताडीची ही घटना नेपाळमधील रस्ते सुरक्षेच्या भीषण वास्तवावर पुन्हा एकदा बोट ठेवणारी आहे. जागतिक बँकेच्या एका ताज्या अभ्यासानुसार, नेपाळमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वेगाने वाढले आहे. दशकापूर्वी जिथे ४,९९९ अपघातांची नोंद होती, तिथे आता हा आकडा ७,६६९ च्या पार गेला आहे. खराब रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन ही यामागची प्रमुख कारणे आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-US Trade Deal: बजेटनंतरचा सर्वात मोठा धमाका! भारत-अमेरिका जारी करणार संयुक्त निवेदन; पियुष गोयल यांनी सांगितली ‘ती’ तारीख
हे अपघात केवळ मानवी जीवच घेत नाहीत, तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही पोखरत आहेत. नेपाळच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (GDP) अंदाजे १.५ टक्के नुकसान केवळ रस्ते अपघातांमुळे होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणारे ७० टक्क्यांहून अधिक लोक हे पादचारी, सायकलस्वार किंवा मोटारसायकलस्वार असतात, जे समाजातील सर्वात गरीब आणि असुरक्षित घटक आहेत. अशा अपघातामुळे एखादा कमवता माणूस गेला की, संपूर्ण कुटुंब गरिबीच्या खाईत लोटले जाते.
Ans: या भीषण बस अपघातात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून ४५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Ans: बसमध्ये सुमारे ६० वऱ्हाडी होते. वधू-वर दुसऱ्या गाडीत असल्याने ते सुरक्षित राहिले.
Ans: वाहनांची वाढती संख्या, डोंगराळ भागातील अरुंद रस्ते आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन ही प्रमुख कारणे आहेत.