NIA likely to visit soon US to bring Mumbai attack mastermind Tahawwur Rana to india
नवी दिल्ली: मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लवकरच पुर्ण होईल यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) चे एक पथक लवकरच अमेरिकेला पोहोचेल. 26/11 ला मुंबईत झालेल्या हल्ल्यात तहव्वूर राणाची भूमिका होती. यामुळे त्याला भारतात आणण्याची तयारी सुरु आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या प्रत्यापर्णाची मागणी मान्य केली होती. या निकालामुळे एक महत्त्वाचा कायदेशीर अडथळा हटला असून भारतीय अधिकाऱ्यांनी राणाला परत आणण्याची प्रक्रिया जलद केली आहे.
दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधारला राणाची मदत
मिळालेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणाला 2009 मध्ये FBIकडून अटक करण्यात आली होती. तर अमेरिकेत राणाला लष्कर-ए-तोएबला पाठिंबा दिल्याने दोषी करार देण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 1-2 दिवसांत NIA ची टिम अमेरिकेला भेट देऊ शकते. याची माहिती गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. तव्हहुर राणा हा माजी डॉक्टर आणि उद्योगपथी असून पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे. राणावर 26/11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार डेव्हिड हेडली याला गुप्तचर कार्यात मदत केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राणाने हेडलील त्याच्या बेकायदेशीर इमिग्रेशन व्यवसायाचा वापर भारतात प्रवास करण्यासाठी, तसेच संभाव्य हल्ल्यासाठी ठिकाणांची माहिती पुरवली होती. 2009 मध्ये शिकागो येथे FBI ने पाकिस्तान समर्थित दहशतवादी नेटवर्कमध्ये राणाच्या भूमिकेसाठी अटक केली होती. मात्र, मुंबई हल्ल्याशी त्याचा थेट संबंध असल्याचा पुरावा न मिळाल्याने त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले होते.
कथानकात महत्त्वाची भूमिका
मुंबई हल्ल्यात 166 लोकांचा बळी घेणाऱ्या आणि शेकडो जखमी झालेल्यांना न्याय देण्यासाठी राणाला भारतात आणण्यासाठी तयारी सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई हल्ल्यात हेडील मदत आणि प्रोत्साहन दिल्याने दहशतवादी कटात त्याची महत्त्वाची भूमिका होती.पहिल्यांदा राण्याच्या प्रत्यार्पणाची मागणी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यालयाने फेटाळली होती. मात्र, गेल्या आठवड्याच भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारांतर्गत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली आणि प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती मिळाली.
प्रत्यार्पण टाळण्यासाठी राणाची ही शेवटची संधी होती. यापूर्वी त्याने सॅन फ्रान्सिस्को न्यायालयात अपील केले होते, मात्र त्याची याचिका फेटाळण्यात आली. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवता येईल, असे अमेरिकन न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते. NIA टीमचा भारत दौरा त्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्याची प्रबळ इच्छाशक्ती दर्शवितो.