Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Helle Leng Visa Cancelled: अवघ्या १० मी आधी व्हिसा रद्द केला…; पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार हेले लेंग यांचा दावा

Helle Leng Visa Cancelled: नॉर्वेमधील वृत्तपत्रात प्रकाशित केलेले लेख आणि सोशल मीडिया पोस्टमधून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच त्यांच्या सरकारवर टीका केली होती. ही पत्रकारिता आणि सरकारवरील टीका व्हिसा रद्द करण्यामागील कारण असू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे

  • By anuradha sagar
Updated On: Nov 13, 2026 | 02:54 PM
India Summit, Visa Controversy, Norwegian Journalist, Amit Shah,

India Summit, Visa Controversy, Norwegian Journalist, Amit Shah,

Follow Us
Follow Us:
  • विमानतळावर निघण्याच्या १० मिनिटे आधी व्हिसा रद्द
  • हैदराबादमधील ‘इंडिया समिट’चे निमंत्रण
  • गृहमंत्री अमित शाहांना हस्तक्षेपाचे आवाहन
Helle Leng Visa Cancelled:    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारल्यामुळे काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेल्या  नॉर्वेजियन पत्रकार हेले लेंग यांनी आपला भारतीय व्हिसा ऐनवेळी रद्द केल्याचा दावा केला आहे. हैदराबाद येथे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या इंडिया समिटमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, भारतात येण्यासाठी निघण्याच्या काही मिनिटे आधी नॉर्वेमधील भारतीय दूतावासातून फोन करून प्रवास करता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

भारतात येण्यापूर्वीच व्हिसा रद्द केल्याचा दावा

हेले लेंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट आणि व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली आहे. त्यांना हैदराबाद येथे होणाऱ्या इंडिया समिटमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेत माध्यमांचे स्वातंत्र्य, पत्रकारिता आणि लोकशाहीचे भविष्य यांसारख्या विषयांवर त्या भाष्य करणार होत्या.

Sewerage Project : भुयारी गटार योजनेवर आणखी ४७६ कोटींची उधळपट्टी? पहिल्या टप्प्याचे काम अपूर्ण असतानाच दुसऱ्या टप्प्याला

लेंग यांच्या म्हणण्यानुसार, भारतात प्रवास करण्यासाठी त्यांना व्हिसा आणि आवश्यक राजकीय परवानगी मिळाली होती. प्रवासाची सर्व तयारी पूर्ण असताना विमानतळाकडे निघण्याच्या सुमारे १० मिनिटे आधी नॉर्वेमधील भारतीय दूतावासातून त्यांना फोन आला. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचे या फोनवर सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

‘पंतप्रधान मोदींना विचारलेल्या प्रश्नांमुळे व्हिसा रद्द?’

व्हिसा रद्द करण्यामागे राजकीय कारण असण्याची शक्यता हेले लेंग यांनी व्यक्त केली आहे. मे २०२६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्वेतील ओस्लो दौऱ्यादरम्यान त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचा या निर्णयाशी संबंध असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

तसेच, नॉर्वेमधील वृत्तपत्रात प्रकाशित केलेले लेख आणि सोशल मीडिया पोस्टमधून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच त्यांच्या सरकारवर टीका केली होती. ही पत्रकारिता आणि सरकारवरील टीका व्हिसा रद्द करण्यामागील कारण असू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, या आरोपांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

IND vs NZ: लाजच काढली! आधी फलंदाजांनी धुतलं मग गोलंदाजांनी रडवलं; Matt Henry च्या वादळात टीम इंडिया ८९ धावांत गारद

अमित शाहांकडे हस्तक्षेपाची मागणी

आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हेले लेंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे  व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिखर परिषदेत त्यांचे भाषण पुढील ४८ तासांत नियोजित असल्याचे सांगत, परवानगी मिळाल्यास पुढील उपलब्ध विमानाने हैदराबादला येण्याची तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा

हेले लेंग यांनी व्हिसा रद्द झाल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्या आरोपांवर केंद्रीय गृह मंत्रालय किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे व्हिसा रद्द करण्यामागील नेमके कारण काय, याबाबतची स्पष्टता सरकारच्या अधिकृत भूमिकेनंतरच येऊ शकणार आहे.

Chandrapur News: चिमूरच्या फुटपाथवर विद्युत खांबांचा अडथळा; अपघाताचा धोका वाढला, महावितरण

१३ आणि १४ नोव्हेंबरला हैदराबादमध्ये इंडिया समिट

काँग्रेसच्या वतीने आयोजित इंडिया समिट १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथे होत आहे. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या परिषदेत जगभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि काँग्रेसच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रमुख सलमान खुर्शीद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, ७० हून अधिक देशांतील एक हजारांपेक्षा अधिक प्रतिनिधींनी सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते, विचारवंत आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश आहे.

या परिषदेत लोकशाही, आंतरराष्ट्रीय संबंध, माध्यमांचे स्वातंत्र्य आणि जागतिक राजकारण यांसारख्या विषयांवर चर्चा होणार आहे. दरम्यान, हेले लेंग यांच्या व्हिसाबाबतचा वाद आणि त्यावरील केंद्र सरकारची भूमिका याकडे आता लक्ष लागले आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: नॉर्वेजियन पत्रकार हेले लेंग भारतात कशासाठी येणार होत्या?

    Ans: हैदराबाद येथे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या 'इंडिया समिट'मध्ये माध्यमांचे स्वातंत्र्य, पत्रकारिता आणि लोकशाहीचे भविष्य या विषयांवर भाष्य करण्यासाठी त्या भारतात येणार होत्या.

  • Que: त्यांचा व्हिसा नेमका कधी आणि कोणामार्फत रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे?

    Ans: विमानतळाकडे निघण्याच्या अवघ्या १० मिनिटे आधी नॉर्वेमधील भारतीय दूतावासातून फोन करून गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • Que: व्हिसा रद्द झाल्यानंतर हेले लेंग यांनी कोणाकडे मदतीची मागणी केली आहे?

    Ans: त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट आणि व्हिडिओ संदेश शेअर करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Norwegian journalist claims indian visa cancelled minutes before flight for india summit as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Congress

संबंधित बातम्या

Sonia Gandhi Book : सोनिया गांधींचा मोठा खुलासा! आणीबाणीवरून राजीव – संजय गांधींमध्ये झाला होता वाद; इंदिरा गांधींची चूकही मान्य
1

Sonia Gandhi Book : सोनिया गांधींचा मोठा खुलासा! आणीबाणीवरून राजीव – संजय गांधींमध्ये झाला होता वाद; इंदिरा गांधींची चूकही मान्य

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं
2

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.