Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित डोवाल उद्या चीनला भेट देणार; काय आहे यामागचा उद्देश? जाणून घ्या सविस्तर

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उद्या चीन भेटीला जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा दौरा भारत आणि चीनमधील LAC संदर्भातील विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेसाठी आयोजित करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 16, 2024 | 07:20 PM
अजित डोवाल उद्या चीनला भेट देणार; काय आहे यामागचा उद्देश? जाणून घ्या सविस्तर

अजित डोवाल उद्या चीनला भेट देणार; काय आहे यामागचा उद्देश? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उद्या चीन भेटीला जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा दौरा भारत आणि चीनमधील LAC संदर्भातील विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेसाठी आयोजित करण्यात आला आहे. या भेटीदरम्यान डोभाल चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेणार आहेत. 17 ते 18 डिसेंबर हा दौर असणार असून या दौऱ्याला भारत-चीन सीमेवरील दीर्घकालीन वाद सोडवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

पाच वर्षांनंतर होणार विशेष प्रतिनिधी स्तरावरील बैठक

2020 मध्ये गलवान घाटीतील संघर्षानंतर ही पहिलीच विशेष प्रतिनिधी स्तरावरील बैठक घेण्यात येणार आहे. यापूर्वी, डिसेंबर 2019 मध्ये अशी बैठक घेण्याच आली होती. LAC संदर्भातील समस्यांवर व्यापक समज वाढवणे आणि दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी आराखडा तयार करणे हा या भेटीचा उद्देश आहे. गलवान संघर्षानंतर भारत-चीन संबंधांवर मोठा परिणाम झाला होता. ही बैठक यशस्वी झाल्यास पुढील कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेसाठी मार्ग मोकळा होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा भारत दौरा; ‘गार्ड ऑफ ऑनर’ने पंतप्रधान मोदींनी केले स्वागत, या मुद्द्यांवर झाली चर्चा

नवी दिल्लीतील चर्चेचा पुढचा टप्पा

काही दिवसांपूर्वीच भारत-चीनमधील वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशन (WMCC) यंत्रणेद्वारे नवी दिल्लीमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत दोन्ही बाजूंनी या उच्चस्तरीय चर्चेची सहमती दर्शवली होती. गेल्या काही वर्षांत LACवरील तणावामुळे द्विपक्षीय संबंध मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत. त्यामुळे हा संवाद दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

दीर्घकालीन शांततेसाठी महत्त्वाचा टप्पा

NSA अजीत डोभाल यांचा चीन दौरा तसेच विशेष प्रतिनिधी स्तरावरील बैठक, भारत-चीन सीमावादाच्या शांततामय तोडग्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. या उच्चस्तरीय चर्चेतून सीमावादावर स्थायी तोडगा काढण्यासाठी पुढील दिशानिर्देश मिळू शकतील. या बैठकीच्या यशस्वीतेमुळे LAC वरील तणाव कमी होऊन, भविष्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी नव्या वाटा निर्माण होतील.

भारत-चीन तणावर कमी करण्यावर सातत्याने प्रयत्न सुरू

2020 नंतर भारत आणि चीनने सीमा तणाव कमी करण्यासाठी अनेक सैनिकी आणि राजनयिक स्तरावर प्रयत्न केले आहेत. उद्या होणारी बैठक दोन्ही देशांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या बैठकी दोन्ही देशांतील मतभेद मिटवून परस्पर विश्वास वाढवण्यावर भर देण्यात येईल.

तसेच, सीमा विवाद व्यवस्थापनासाठी स्थिर आणि दीर्घकालीन व्यवस्था निर्माण करण्याची संधी देईल. भारत-चीन संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ही बैठक निर्णायक ठरू शकते. जर सकारात्मक निष्कर्ष निघाले, तर सीमावादावर स्थायी तोडगा काढण्याचा मार्ग सुलभ होईल आणि शांततेचा नवा अध्याय सुरू होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा जागतिक स्तरावर परिणाम; मात्र ‘या’ देशांना झाला मोठा फायदा, भारताचे नाव यादीत आहे का?

Web Title: Nsa ajit doval to visit china tomorrow what is the purpose know in detail nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • China
  • india

संबंधित बातम्या

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
1

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
2

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
3

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
4

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.