फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके त्यांच्या भारत दौऱ्यावर आहेत. काल दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दिसानायके यांचा हा पहिला परदेश दौरा असून ते 15 ते 17 डिसेंबरदरम्यान भारताच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांनी त्यांनी विदेश दौऱ्यासाठी पहिल्यांदा भारताची निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
भारत-श्रीलंका भागीदारीला “फ्युचरिस्टिक व्हिजन”
पंतप्रधान मोदींनी यांनी म्हटले की, श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा भारतात स्वागत करताना मला आनंद होत आहे. राष्ट्रपती म्हणून त्यांनी पहिल्या विदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली, हे आमच्यासाठी सन्मानाचे आहे. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील.” पंतप्रधानांनी भारत-श्रीलंका भागीदारीला “फ्युचरिस्टिक व्हिजन” म्हणून ओळखले.
त्यांनी आर्थिक सहकार्य, गुंतवणूक-आधारित विकास आणि डिजिटल, भौतिक आणि ऊर्जा क्षेत्रांतील कनेक्टिव्हिटीवर भर दिला. दोन्ही देशांनी इलेक्ट्रिसिटी ग्रिड कनेक्टिव्हिटी, मल्टी प्रॉडक्ट पेट्रोल पाइपलाइन आणि सोलर प्रोजेक्ट्सच्या मुद्द्यांवल चर्चा केली. यामुळे दोन्ही देशांमधील ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट होईल.
राष्ट्रपती दिसानायके यांनी राजघाट येथे महात्मा गांधीना श्रद्धांजली अर्पण केली
सोमवारी सकाळी राष्ट्रपती दिसानायके यांनी महात्मा गांधींच्या राजघाट येथील स्मारकाला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन त्यांच्या सोबत होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या शाश्वत तत्त्वांनी जगभरातील मानवतेला प्रेरणा दिली आहे.
During my official visit to India, I had the privilege of engaging in productive discussions with Finance Minister @nsitharaman, External Affairs Minister @DrSJaishankar, and National Security Advisor Shri Ajit Doval. Our conversations focused on strengthening Indo-Sri Lanka… pic.twitter.com/A5mkZ4TS1D
— Anura Kumara Dissanayake (@anuradisanayake) December 15, 2024
अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची भेट
दिसानायके यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामण, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांच्याशीही भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी आर्थिक सहकार्य, गुंतवणुकीच्या संधी वाढवणे, प्रादेशिक सुरक्षा मजबूत करणे, पर्यटन आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रांवर चर्चा केली.
तसेच, जयशंकर यांनी ‘नेबर फर्स्ट पॉलिसी’ आणि ‘सागर दृष्टिकोना’मध्ये श्रीलंकेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती दिसानायके यांच्या चर्चेमुळे भारत-श्रीलंका सहकार्याला नवीन उंची मिळेल. या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.