Population of Hindus in Brunei
बंदर सेरी बेगवान : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ब्रुनेई देशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर ब्रुनेई देशाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ब्रुनेईचा सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी ब्रुनेई दारुसलामला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींचा ब्रुनेई दौरा ही भारतीय पंतप्रधानांची पहिली द्विपक्षीय भेट आहे. पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान ब्रुनेई या देशाला भेट देणार आहेत. पण ब्रुनेईमध्ये असणारी हिंदूंची संख्या अत्यंत अल्प आहे. केवळ काही शे हिंदू या देशामध्ये राहतात.
ब्रुनेईच्या आर्थिक नियोजन विभागाने त्यांच्या देशाची लोकसंख्या जाहीर केली आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, ब्रुनेईची लोकसंख्या 4 लाख 50 हजार आहे, त्यापैकी 2,37,700 पुरुष आहेत. ब्रुनेई जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे मुस्लिम लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे. जर आपण मुस्लिम लोकसंख्येबद्दल बोललो तर येथे मुस्लिम लोकसंख्या 82 टक्के आहे. याशिवाय 6.7 टक्के ख्रिश्चन आहेत. ब्रुनेई 67 टक्के मलय आणि 15 टक्के चिनी लोक राहतात. मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांसोबत येथे बौद्ध धर्माचे लोक देखील राहतात. त्यांच्या लोकसंख्या जवळपास 6.3 टक्के आहे. ख्रिश्चन आणि बौद्ध धर्माचे लोक जवळपास समान आहेत. याशिवाय 5 टक्के लोक विविध धर्माचे लोक आहेत. यामध्ये हिंदू, नास्तिक, शीख, ज्यू इत्यादींचा समावेश आहे.
ब्रुनेईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची सर्वत्र चर्चा असल्यामुळे या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंची देखील चर्चा होत आहे. येथील हिंदू लोकसंख्येबाबत वेगवेगळे अहवाल आहेत. अनेक अहवाल सांगतात की येथे सुमारे 200 लोक हिंदू आहेत. तसेच, ब्रुनेईमध्ये भारताचे 14,500 लोक राहतात, अशी माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे.
पंतप्रधान मोदी दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रुनेईमध्ये दौरा आहे. ब्रुनेईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूरला जाणार आहेत. त्यांचा सिंगापूर दौरा 4 ते 5 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून ते तेथे पोहोचतील. या दोन देशांच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान ब्रुनेईची सर्वाधिक चर्चा होत आहे. येथे अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे. ब्रुनेई हा एक छोटासा देश आहे, या देशातील सुलतान हसनल बोलक्या सर्वांत श्रीमंत सुलतान आहे. ते देशाचे पंतप्रधानपदही देखील कार्यभार सांभाळत आहेत.