Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OpenAI News : OpenAI मधील ‘एथिक्स’ प्रमुखांची वर्षभरातच एक्झिट; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे चर्चेला उधाण

OpenAI News : OpenAI मधील AI Ethics प्रमुख क्लोई बाकलार यांनी कंपनीत रुजू झाल्यानंतर वर्षभर पूर्ण होण्याआधीच कंपनी सोडली आहे. त्यांच्या एक्झिटनंतर कंपनीतील Safety आणि Mission Alignment क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अलीकडील राजीनाम्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 13, 2026 | 07:33 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • Safety विभागातील अधिकाऱ्यांच्या एक्झिटनंतर आणखी एक धक्का
  • OpenAIची भूमिका काय?
OpenAI News :  OpenAI मधील AI Ethics प्रमुख क्लोई बाकलार यांनी कंपनीत रुजू झाल्यानंतर वर्षभर पूर्ण होण्याआधीच कंपनी सोडली आहे. त्यांच्या एक्झिटनंतर कंपनीतील Safety आणि Mission Alignment क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अलीकडील राजीनाम्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी OpenAI सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एक्झिटमुळे चर्चेत आली आहे. कंपनीच्या AI Ethics प्रमुख क्लोई बाकलार यांनी OpenAI मध्ये रुजू झाल्यानंतर वर्षभर पूर्ण होण्याआधीच कंपनी सोडल्याचे वृत्त समोर आले आहे. बाकलार यांनी ऑगस्ट 2025 मध्ये OpenAIमध्ये प्रवेश केला होता आणि जुलै 2026 मध्ये त्यांनी कंपनी सोडली. त्यांच्या जाण्याची सार्वजनिक घोषणा करण्यात आली नव्हती.

Nepal Communal Violence : नेपाळच्या मधेशमध्ये धार्मिक तणावाचा स्फोट; भारताच्या सीमेसमोर नवे सुरक्षा आव्हान ?

क्लोई बाकलार यांची OpenAIमधील भूमिका विशेष महत्त्वाची मानली जात होती. त्या कंपनीतील AI Ethicsवर विशेष लक्ष देणाऱ्या एकमेव समर्पित तज्ज्ञ असल्याचे वृत्त आहे. AI मॉडेल्स विकसित करताना नैतिक बाबी, मानव आणि AI यांच्यातील परस्परसंवाद तसेच भविष्यातील AI प्रणालींशी संबंधित नैतिक प्रश्नांवर त्या काम करत होत्या. यापूर्वी त्यांनी Metaमध्ये AI Ethics कार्यक्रमाचे नेतृत्व केले होते.

Safety विभागातील अधिकाऱ्यांच्या एक्झिटनंतर आणखी एक धक्का

बाकलार यांच्या जाण्यापूर्वी OpenAIमधून Safety Systemsचे प्रमुख जोहानेस हेडेके यांनीही कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला होता. जुलै 2026 मध्ये त्यांच्या एक्झिटची माहिती समोर आली. त्यांचा निर्णय कंपनीने Safety आणि Research टीमच्या पुनर्रचनेनंतर घेतला. त्यानंतर Safety टीमची जबाबदारी कंपनीतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली.

याशिवाय Joshua Achiam यांचाही OpenAIमधील महत्त्वाच्या भूमिकेतील प्रवास संपला आहे. Mission Alignment टीमचे पुनर्गठन आणि त्यानंतरच्या संस्थात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर OpenAIच्या AI Safety आणि Alignment धोरणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. Mission Alignment टीम यापूर्वी कंपनीच्या AI विकासातील सुरक्षितता आणि OpenAIच्या व्यापक ध्येयाशी सुसंगतता यावर काम करत होती.

OpenAIची भूमिका काय?

क्लोई बाकलार यांच्या जागी तातडीने नवीन ‘Ethics Chief’ नियुक्त केला जाणार असल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र OpenAIने AI Ethicsची जबाबदारी एका व्यक्ती किंवा स्वतंत्र टीमपुरती मर्यादित नसल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नैतिक विचार हे मॉडेल विकसित करणाऱ्या विविध संशोधन टीमच्या कामातच समाविष्ट केले जात आहेत.

दरम्यान, बाकलार यांनी आपल्या जाण्याचे नेमके कारण सार्वजनिक केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामागे कंपनीतील कोणतेही विशिष्ट मतभेद होते, असा निष्कर्ष काढणे सध्या योग्य ठरणार नाही.

Saudi-Pakistan-Turkey Pact : सौदीला अण्वस्त्रांपासून रोखण्यासाठी अमेरिकेचा ‘इस्लामिक NATO’ डाव?

मात्र AI क्षेत्रात मॉडेल्सची क्षमता वेगाने वाढत असताना त्यांची सुरक्षितता, नैतिकता आणि जबाबदारी याबाबत जगभरात चर्चा सुरू आहे. अशा काळात OpenAIमधून Ethics आणि Safetyशी संबंधित वरिष्ठ व्यक्तींच्या एक्झिटमुळे कंपनीच्या अंतर्गत धोरणांवर आणि AI Safetyच्या भविष्यातील दिशेवर लक्ष केंद्रित झाले आहे.

Web Title: Openai news openais head of ethics exits after just a year resignations of senior officials spark widespread speculation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • ai
  • Artificial intelligence

संबंधित बातम्या

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर
1

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..
2

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?
3

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?

AI Film Industry: AI च्या युगातही कथेचं महत्त्व कायम! अभिषेक एस. व्यास यांनी सांगितलं सिनेमाचं खरं गमक
4

AI Film Industry: AI च्या युगातही कथेचं महत्त्व कायम! अभिषेक एस. व्यास यांनी सांगितलं सिनेमाचं खरं गमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.