Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Armed Forces: युद्धात कोण ठरणार वरचढ, माणूस की AI? पुण्यातील ‘मिलिट’मध्ये रंगले महत्त्वाचे चर्चासत्र

Indian Armed Forces: संरक्षण क्षेत्रातील तांत्रिक स्वावलंबनासाठी स्वदेशी एआय तंत्रज्ञान विकसित करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. यासाठी शैक्षणिक संस्था, संशोधन क्षेत्र आणि उद्योगांमधील सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 16, 2026 | 06:38 PM
आधुनिक युद्धभूमीवर ‘एआय विरुद्ध एआय’चा संघर्ष

आधुनिक युद्धभूमीवर ‘एआय विरुद्ध एआय’चा संघर्ष

Follow Us
Follow Us:
  • आधुनिक युद्धभूमीवर ‘एआय विरुद्ध एआय’चा संघर्ष
  • मिलिटमध्ये युद्धतंत्रातील नव्या आव्हानांवर चर्चासत्र
  • स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित शस्त्रप्रणालींच्या विकासावर भर
सुनयना सोनवणे/Indian Armed Forces:  भविष्यातील युद्धाचे स्वरूप तंत्रज्ञानावर आधारित असणार असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर युद्धातील निर्णयप्रक्रिया आणि लष्करी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मिलिट) येथे ‘एआय विरुद्ध एआय’ युद्धतंत्रातील नवी क्षितिजे’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘कॅपस्टार-१२’ या तिन्ही संरक्षण दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण उपक्रमांतर्गत शनिवारी (ता.१४) हे चर्चासत्र पार पडले.

एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय, लष्कर, नौदल, हवाई दल, संरक्षण आस्थापना, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. आधुनिक युद्धात एआयचा वाढता वापर, स्वयंचलित यंत्रणा, त्यांना निष्प्रभ करणारे तंत्रज्ञान, एआय आधारित शस्त्रप्रणाली आणि मानव-यंत्र समन्वय अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. युद्धभूमीवर अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढविण्यासह संरक्षण दलांची कार्यक्षमता आणि सज्जता बळकट करण्यासाठी एआयचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

AI Weapons : ‘कोण जगेल आणि कोण मरेल, हे यंत्रांनी ठरवू नये…’ एआय युद्धाच्या नियमांवर 128 देशांची मोठी खलबते

संरक्षण क्षेत्रातील तांत्रिक स्वावलंबनासाठी स्वदेशी एआय तंत्रज्ञान विकसित करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. यासाठी शैक्षणिक संस्था, संशोधन क्षेत्र आणि उद्योगांमधील सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला.

चर्चासत्रात ‘नवोन्मेष’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनी विकसित केलेले एआय तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण संकल्पना आणि त्यांचे संभाव्य लष्करी उपयोग प्रदर्शित करण्यात आले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्र, संरक्षण आस्थापनांतील अधिकारी आणि विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळाली. भविष्यातील तंत्रज्ञानाधारित युद्धातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संरक्षण दलांची क्षमता विकसित करणे आणि तिन्ही दलांमधील समन्वय वाढविणे, हा या चर्चासत्राचा उद्देश होता.

पाकिस्तानची फाटणार! शत्रूला मारण्यासाठी भारताचे ‘Pralay’ सज्ज; ओडिशाच्या किनारपट्टीवर…

या परिसंवादाने तांत्रिक जागरूकता वाढवणे, तिन्ही दलांमधील समन्वय अधिक दृढ करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर  आधारित व तंत्रज्ञानाने व्यापलेल्या आधुनिक युद्धभूमीवरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सशस्त्र दलांना सज्ज करण्याप्रती असलेल्या ‘मिलिट’च्या कटिबद्धतेला अधिक बळकटी दिली. जागतिक क्षेत्रात एआयचे महत्व वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे आजचा परिसंवाद हा सुरक्षा दलांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यातील मिलिट संस्थेत कोणत्या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते?

    Ans: पुण्यातील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मिलिट) येथे ‘एआय विरुद्ध एआय : युद्धतंत्रातील नवी क्षितिजे’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

  • Que: आधुनिक युद्धामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कशासाठी होणार आहे?

    Ans: आधुनिक युद्धामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर युद्धातील निर्णयप्रक्रिया, एआय आधारित शस्त्रप्रणाली, स्वयंचलित यंत्रणा आणि लष्करी कारवायांमध्ये होणार आहे.

Web Title: Indian armed forces discussion on ai vs ai conflict held at military institute of technology deffence pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Indian Armed Forces
  • War News

संबंधित बातम्या

AI Weapons : ‘कोण जगेल आणि कोण मरेल, हे यंत्रांनी ठरवू नये…’ एआय युद्धाच्या नियमांवर 128 देशांची मोठी खलबते
1

AI Weapons : ‘कोण जगेल आणि कोण मरेल, हे यंत्रांनी ठरवू नये…’ एआय युद्धाच्या नियमांवर 128 देशांची मोठी खलबते

Mercor AI : अवघ्या 23 व्या वर्षी 40,000 कोटींचे मालक; हार्वर्ड सोडून बनले अब्जाधीश, आदर्श हिरेमठ अन् सूर्य मिधा यांची भन्नाट कहाणी
2

Mercor AI : अवघ्या 23 व्या वर्षी 40,000 कोटींचे मालक; हार्वर्ड सोडून बनले अब्जाधीश, आदर्श हिरेमठ अन् सूर्य मिधा यांची भन्नाट कहाणी

Breaking News : एनव्हीडियाला मोठा धक्का; जेन्सन हुआंग यांचा CEO पदाचा तात्काळ राजीनामा ,अमेरिकन शेअर बाजार आदळला
3

Breaking News : एनव्हीडियाला मोठा धक्का; जेन्सन हुआंग यांचा CEO पदाचा तात्काळ राजीनामा ,अमेरिकन शेअर बाजार आदळला

Tech News : Meta AI आता थेट स्मार्टवॉचवर; Apple Watch आणि Android घड्याळांवरून करता येणार AI शी संवाद
4

Tech News : Meta AI आता थेट स्मार्टवॉचवर; Apple Watch आणि Android घड्याळांवरून करता येणार AI शी संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.