Operation Sindoor Army hits Pahalgam attack planning site
Operation Sindoor : भारताने अखेर पहलगाममधील निर्दोष नागरिकांच्या हत्येचा बदला घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हवाई प्रहार करून, त्या अड्ड्यांना जमीनदोस्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ल्याच्या ठिकाणांचा व्हिडिओ संरक्षण खात्याने प्रसारित केला असून, दहशतवादी कारवायांची केंद्रे कशी उद्ध्वस्त झाली हे त्यातून दिसून येते.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारताची अत्यंत नियोजित आणि लक्ष केंद्रित कारवाई होती. पाकिस्तानातील बहावलपूर, मुझफ्फराबाद, कोटली आणि इतर ठिकाणी असलेल्या जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण तळ या कारवाईचा मुख्य हेतू होते. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने बहावलपूरमधील जामी मस्जिद सुभानअल्लाहवर हल्ला केला, ही मशिद जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय मानली जाते. याशिवाय कोटली येथील हिजबुल मुजाहिदीनचे प्रशिक्षण केंद्र आणि मुझफ्फराबादमधील लष्करचे प्रशिक्षण तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Operation Sindoor’ नंतर पाक पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची पहिलीच प्रतिक्रिया; जम्मू-कश्मीरमध्ये अलर्ट, विमानसेवा विस्कळीत
भारतीय संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, एकूण नऊ ठिकाणी अचूक हवाई हल्ले करण्यात आले. या ठिकाणांवरून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली जात होती. मंत्रालयाने स्पष्ट केले की, “ही कारवाई लक्ष्यित, मोजमापित आणि पूर्णतः न उत्तेजक स्वरूपाची होती.” कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आलेले नाही. यामुळे भारताची संयमित पण ठाम भूमिका अधोरेखित झाली आहे.
#WATCH | Visuals from an undisclosed location in J&K as the Indian Armed Forces launched ‘Operation Sindoor’, hitting terrorist infrastructure in Pakistan and Pakistan-occupied Jammu and Kashmir from where terrorist attacks against India have been planned and directed.… pic.twitter.com/3D20pDXkND
— ANI (@ANI) May 6, 2025
credit : social media
‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दहशतवादी संघटनांनी भारतीय भूमीवर केलेल्या या हल्ल्याचा निषेध करत सरकारने कठोर आणि निर्णायक कृतीचे वचन दिले होते, ते प्रत्यक्षात उतरवले गेले आहे.
या कारवाईत भारताने हाफिज सईद आणि मसूद अझहरच्या थेट तळांवर हल्ला केला आहे, जे भारतविरोधी दहशतवादी कारवायांचे मुख्य सूत्रधार मानले जातात. या तळांवरूनच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते आणि भारताविरुद्ध षड्यंत्र रचले जात होते.
ही कारवाई म्हणजे केवळ सूड नसून, भारताची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मजबूत भूमिका आहे. भारतीय लष्कराने संयम दाखवत केवळ दहशतवादी अड्ड्यांनाच लक्ष्य केले, कोणत्याही निष्पाप नागरिकांना धक्का पोहोचू नये याची काळजी घेतली. संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, “ज्यांनी हल्ल्याची योजना आखली आणि अंमलात आणला, त्यांना जबाबदार धरले जाईल, हे आमचे वचन आम्ही पूर्ण करत आहोत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindoor: जय हिंद! भारताने घेतला पहलगामचा बदला; पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर Air Strike
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, दहशतवादाचा मुकाबला निर्धाराने आणि अचूकतेने करणे हाच मार्ग आहे. पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त करून, भारताने केवळ देशाच्या सुरक्षेची नव्हे, तर अंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधात असलेल्या भूमिकेचीही प्रचीती दिली आहे. ही कारवाई भविष्यातील संभाव्य दहशतवादी हल्ल्यांना रोखण्याचा मजबूत इशारा मानली जात आहे. आणखी तपशील लवकरच उघड केले जाणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.