Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंगाल पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट की सैनिकांचही पोट भरु शकत नाही? त्यांच्या अन्न निधीत केली कपात

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, पाकिस्तान सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करणे, परदेशी मोहिमांची संख्या कमी करणे आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) यांना देण्यात येणारा गुप्त निधी मर्यादित करणे यासह अनेक विचार करत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 01, 2023 | 03:20 PM
कंगाल पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट की सैनिकांचही पोट भरु शकत नाही? त्यांच्या अन्न निधीत केली कपात
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : पाकिस्तानमध्ये (Pakistan) इंधनाचे दर गगनाला भिडल्याने पाकिस्तानमधील आर्थिक संकट (Pakistan Economic Crisis) वाढत आहे. दुसरीकडे, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे आधीच गगनाला भिडलेली महागाई  (Inflation) आणखी वाढली आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने व्याजदरात आणखी वाढ केली आहे. आता पाकिस्तान सरकारने सामान्य जनतेपासून संपूर्ण देशावर कर वाढवला आहे, आता पाकिस्तानच्या सैन्यात काम करणारे सैनिकही यापासून अस्पर्श राहिलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील लष्कराच्या मेसमध्ये अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

[read_also content=”छायाचित्रकाराची अनोखी कला! समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांमध्ये दाखवला ‘जलदेवते’चा चेहरा, व्हायरल फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ https://www.navarashtra.com/viral/british-photographer-capture-face-from-wave-photo-goes-viral-nrps-373232.html”]

फील्ड कमांडर्सनी मास्टर जनरलला पत्र लिहिले असुन त्यात म्हण्टलय की,  देशाच्या विशेष निधीत कपात केल्यामुळे, वाढत्या महागाईत लष्कराला दोनवेळचे अन्न नीट मिळत नाही आहे. फील्ड कमांडर्सनी क्वार्टर मास्टर जनरलच्या कार्यालयाला पत्र लिहून अन्नाचा तुटवडा झाल्याचं सांगितलं आहे. अहवालात म्हटले आहे की लष्करी अधिकार्‍यांनी अन्नपुरवठा आणि अन्नधान्याच्या मुद्द्यांवर लॉजिस्टिक स्टाफचे प्रमुख आणि मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक यांच्याशी चर्चा केली आहे. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याकडेही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या अहवालात एका सूत्राचा हवाला देऊन म्हटले आहे की, आम्ही सैनिकांच्या अन्न निधीत कपात केली आहे, जी जनरल राहिल शरीफ यांनी 2014 मध्ये ऑपरेशन जरब-ए-अझब दरम्यान दुप्पट केली होती.

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, पाकिस्तान सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करणे, परदेशी मोहिमांची संख्या कमी करणे आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) यांना देण्यात येणारा गुप्त निधी मर्यादित करणे यासह अनेक विचार करत आहे.   या उपाययोजनांचा सरकारच्या कामकाजावर मोठा परिणाम होत असल्याचे सांगत. पाकिस्तानमध्ये किंमती वाढल्याच त्यांनी सांगितलं. दरम्यान,  डॉनने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान पाच महिन्यांत प्रथमच महागाई 40% पेक्षा जास्त झाली आहे. पाकिस्तान ब्युरो (PBS) कडील डेटा असे दर्शवितो की आठवडा-दर-आठवड्यातील महागाईत किंचित घट होऊनही जीवनावश्यक वस्तू महाग राहतील.

Web Title: Pakistan is not able to feed the pakistani army due to economic crisis nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2023 | 03:20 PM

Topics:  

  • pakistan economic crisis
  • shahbaaz sharif

संबंधित बातम्या

असीम मुनीर राष्ट्रपती होणार? झरदारी यांना हटवण्याच्या चर्चांवर शाहबाज शरीफ यांचं ‘मोठं विधान’
1

असीम मुनीर राष्ट्रपती होणार? झरदारी यांना हटवण्याच्या चर्चांवर शाहबाज शरीफ यांचं ‘मोठं विधान’

पाकिस्तानचे दोन नाही तर तीन तुकडे होण्याची शक्यता; बलुचिस्ताननंतर सिंधमध्येही बंडखोरीच्या हालचाली
2

पाकिस्तानचे दोन नाही तर तीन तुकडे होण्याची शक्यता; बलुचिस्ताननंतर सिंधमध्येही बंडखोरीच्या हालचाली

Pahalgam Terror Attack: भारताच्या भीतीने पाकिस्तानमध्ये सत्तापालट? आर्मी PM शरीफांची हकालपट्टी करणार? वाचा…
3

Pahalgam Terror Attack: भारताच्या भीतीने पाकिस्तानमध्ये सत्तापालट? आर्मी PM शरीफांची हकालपट्टी करणार? वाचा…

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानने इथेही मारली भारताची नक्कल, कॉपी केले भारताचेच निर्णय; हवाई बंदी अन्…
4

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानने इथेही मारली भारताची नक्कल, कॉपी केले भारताचेच निर्णय; हवाई बंदी अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.