Philippines Earthquake: मनिला : फिलिपिन्स भूंकपाच्या (Earthquake) धक्क्यांनी हादरला आहे. मंगळवारी रात्री ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा झटका फिलिपिन्सला बसला. यामुळे देशात प्रचंड विध्वंस झाला आहे. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. भूकंपामुळे अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीजपुरवठाही खंजिड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विध्वंसक भूकंपात आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहे. सध्या आपत्कालीन सेवांनी बचाव कार्य सुरु केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, फिलिपिन्सची लोकसंख्या ९० हजार असून सेबू प्रांतात १४ रहिवाशांचा मृत्यू झाले आहे. सध्या सेबू प्रांतात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे आपत्ती व्यवस्थापन संस्थांनी म्हटले आहे. भूकंपामुळे भूस्खलन आणि दगड कोसळ्याने डोंगराळ भागांमध्ये मदतकार्य पोहोचवणे कठीण झाले आहे.
या भूकंपामुळे एका चर्चचे मोठे नुकसान झाले आहे.
Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
ओसोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, फिलिपिन्सच्या बोगोजवळील मेडेलिन शहारातही प्रचंड विनाश झाला आहे. यामुळे १२ लोक मरण पावले आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेत, फिलिपिन्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्केनॉलॉजी अँड सिस्मोलॉजीने लोकांना सेबू आणि लेयटे बिलिरन प्रांतातून, तसेच सागरी भागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, फिलिपिन्सच्या सेबू आणि इतर प्रांतातमध्ये बुआलोई वादळाचा फटका बसला होता. या वादळातून सावरत असतानाच हा भूकंप झाला. यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. बुआलोई वादळाने देखील प्रचंड विनाश घडवनू आणला होता. यामुळे २० लोक मृत्यूमुखी पडले होते. पूराच्या पाण्यात बुडून अनेकांचा मृत्यू झाला होता. शिवाय वादळामुळे अनेक लोकांना आपली घरे रिकामी करावी लागली होती.
फिलिपिन्स हा जगातील सर्वाधिक आपत्तीग्रस्त देशांपैकी एक आहे. फिलिपिन्स हा पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायवर स्थित आहे. यामुळे फिलिपिन्समध्ये सतत भूकंप होत असतात. दरवर्षी फिलिपिन्समध्ये चक्रीवादळे, भूकंप सतत होत असतात. यामुळे येथील लोकांमध्ये सध्या प्रचंड भीतीचे वातावर आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावत आहे.
प्रश्न १. फिलिपिन्समध्ये किती रिश्टर स्केलचा भूकंप झाला?
फिलिपिन्समध्ये ६.७ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला आहे.
प्रश्न २. फिलिपिन्समध्ये भूकंपामुळे किती जीवितहानी झाली आहे?
फिलिपिन्समध्ये भूकंपामुळे सेबू प्रदेशात १४ रहिवाशांचा, तर मेडेलिन शहरात १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोकही जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यात आहे.
प्रश्न ३. फिलिपाइन्समध्ये भूकंप का होत असतात?
फिलिपिन्स हा पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायवर स्थित आहे, यामुळे या भागात सतत भूकंप होत असतात.
ट्रम्प यांनी तयार केला गाझाचा नवीन नकाशा? सीमेवर इस्रायल बफर-झोनसह होणार ‘हे’ बदल, समजून घ्या