कंगाल पाकिस्तानला ७ अब्ज डॉलरची मदत मिळणार? (Photo Credit- X)
Pakistan IMF Loan: पाकिस्तान पुन्हा एकदा गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून नवीन कर्जासाठी मदत मागितली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार, IMF मिशनने पाकिस्तानच्या आर्थिक शिष्टमंडळासोबत औपचारिक बैठक घेतली आहे.
ही बैठक ७ अब्ज डॉलरच्या कर्ज कार्यक्रमाच्या आणि १.१ अब्ज डॉलरच्या ‘रेझिलिएंट सस्टेनेबिलिटी फॅसिलिटी (RSF)’ च्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. जून २०२५ पर्यंत कार्यक्रमाची कामगिरी समाधानकारक नसल्याने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
An IMF mission held a formal kick-off meeting with Pakistan’s economic team to review the implementation of a $7 billion loan and a $1.1 billion Resilience and Sustainability Facility, according to a media report on Tuesday.https://t.co/8eUuwH763s — businessline (@businessline) September 30, 2025
IMF च्या मिशन प्रमुख इवा पेट्रोवा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी शिष्टमंडळाची भेट घेतली. या बैठकीत स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर, वित्त सचिव आणि फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू (FBR) चे अध्यक्ष यांसारखे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण जगाला कर्ज देणाऱ्या IMF कडे पैसा येतो कुठून? जाणून घ्या
हे IMF पथक पुढील दोन आठवडे पाकिस्तानमध्ये राहणार असून, ते ७ अब्ज डॉलरच्या ‘एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (EFF)’ आणि १.१ अब्ज डॉलरच्या ‘RSF’ ची प्रगती तपासतील. डिसेंबर २०२५ पर्यंतची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी दोन्ही पक्ष आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करतील.
पाकिस्तान सरकार आपल्या रखडलेल्या ब्राउनफिल्ड पेट्रोलियम रिफायनरी धोरणांना वेग देण्यासाठी IMF कडून मदत मिळण्याची अपेक्षा करत आहे. या धोरणांच्या अंमलबजावणीत झालेल्या विलंबामुळे सुमारे ६ अब्ज डॉलरची नवीन गुंतवणूक अडकून पडली आहे.
पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे धोरण ‘RSF’ च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे, कारण रिफायनरीज अपग्रेड झाल्यानंतर युरोपियन मानके पूर्ण करणारी, कमी कार्बन आणि सल्फर उत्सर्जन असलेली पेट्रोलियम उत्पादने तयार होतील. उर्वरित उद्दिष्टे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान IMF सोबत सकारात्मक चर्चा करत आहे.