ट्रम्प यांनी तयार केला गाझाचा नवीन नकाशा? सीमेवर इस्रायल बफर-झोनसह होणार 'हे' बदल, समजून घ्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Trump Gaza Plan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या गाझात युद्धबंदीसाठी प्रयत्न करत आहे. यासाठी ट्रम्प यांनी २० कलमी योजना आखली आहे. याला इस्रायलने पाठिंबा दर्शवला आहे पण हमासने अद्याप याला मान्यता दिलेली नाही. या योजनेचा भाग म्हणून ट्रम्प यांनी एक नकाशा तयार केला आहे.
यानुसार ट्रम्प गाझाला दहशतवाद मुक्त आणि शांततामय प्रदेश बनवणार आहे. यासाठी त्यांनी इस्रायल ते गाझा दरम्यान एक बफर झोनचा आराखडा तयार केला आहे. यानुसार इस्रायली सैन्य आणि पॅलेस्टिनी लोक सीमारेषा ओलांडून जाऊ शकणार नाही.
खालील दिलेल्या ट्विटमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रम्प यांनी जारी केलेल्या नकाशात तीन रेषा आहेत. यामध्ये लाल, पिवळा, आणि निळा रंगाचा भाग बफर झोन आहे.
हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?
याशिवाय ट्रम्प यांनी हमाससोमर काही अटी देखील ठेवल्या आहेत-
President Donald J. Trump’s Comprehensive Plan to End the Gaza Conflict: 1. Gaza will be a deradicalized terror-free zone that does not pose a threat to its neighbors. 2. Gaza will be redeveloped for the benefit of the people of Gaza, who have suffered more than enough. 3. If… pic.twitter.com/veqhr9MW28 — Rapid Response 47 (@RapidResponse47) September 29, 2025
या आराखड्यानुसार, सीमा सुरक्षाही मजबूत केली जाईल. युद्ध संपेपर्यंत सर्व हल्ले आणि गोळीबार थांबवला जाईल. यामुळे गाझात भविष्यात कोणत्याही प्रकारची अस्थिपता निर्माण होणार नाही.