मॉस्को- युक्रेनवर हल्ला करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना देशात विरोधाचा सामना करावा लागत आहे. रशियाची अर्थव्यवस्था या युद्धात पणाला लागली आहे. अमेरिका, युरोप आणि काही आशियाई राष्ट्रांनी रशियावर आर्थिक प्रतिबंध घातले आहेत, तर दुसरीकडे अनेक नामांकित कंपन्यांनी रशियातील काम पूर्णपणे थांबवले आहे. अशा परिस्थितीत रशियन जनतेचा पुतीन यांना होणारा विरोओध हा स्वाभाविकच म्हणावा लागेल.
रशियात युद्धाविरोधात जनतेची मोठमोठी आंदोलने सुरु झाली आहेत. यात अनेक जम सहभागी होत आहेत. एका रशियन पायलटने या युद्धाची निंदा केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत पायलट म्हणतोय- युक्रेनसोबत पुकारलेले युद्ध हा एक अपराध आहे. समजूतदार नागरिक माझ्या या मताशी सहमत असतील. हे सर्व थांबवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. हे युद्ध थांबावे अशी मागमी या पायलटने केली आहे. हा पायलट रशियन एयरलाईन एअरोप्लोटची सहाय्याक कंपनी पोबेडा यांचा क्रमचारी आहे. पायलटने तुर्कीत विमान पोहचल्यानंतर प्रवाशांना हा संदेश दिला.
रशियाची लाज वाटते-पत्रकार अल्बात्स
रशियाची पत्रकार येवजिनिया अल्बात्स यांनीही या हल्ल्याची निंदा केली आहे. त्या म्हणतात- मला लाज वाटते की मी जो टॅक्स् देते त्यातून बॉम्ब बनवण्यात य़ेतात आणि ते ब़म्ब युक्रेनवर टाकले जात आहेत. मी युक्रेनवासियांची क्षमा मागते. माझा देश तुमच्यासोबत करतोय ते योग्य नाही.
युद्ध थांबवण्याच्या मागणीसाठी आंदोलने
रशियाची राजधानी मॉस्को, सेंट पिटर्सबर्ग आणि इतर शहरांत हे युद्ध थांबावे यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यांवर उतरत आहेत. सरकारविरोधात ते घोषमाबाजी करीत आहेत. युक्रेवर हल्ल्याचा निषेध करणारी पत्रे पाठवण्यात येत आहेत. रशियासोबतच जपान, हंगेरी, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासारख्या अनेक देशांनी युक्रेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवत पुतीन यांच्यावर टीका केली आहे. हे युद्ध थांबवण्याची मागणी सातत्याने जोर धरु लागली आहे. याकाळात रशियात आत्तापर्यंत ८०० हून अधिक जणांना विरोओध करतात म्हणून ताब्यात घेतले आहे.
लढाईत सुमारे १३०० सैनिकांचा मृत्यू
युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होते आहे. युद्ध सुरु होऊन १८ दिवस उलटले तरी अद्यापही रशियाला पुरेसे यश मिळालेले नाही. रशियन सैन्य सातत्याने युक्रेनमध्ये बॉम्बहल्ले, क्षेपणास्त्र हल्ले करीत आहेत. पूर्ण युक्रेन बेचिराख होण्याच्या मार्गावर आहे. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांच्या दाव्यानुसार त्तापर्यंत १३०० हून अधिक युक्रेनी सैनिक या युद्धात मारले गेले आहेत. तर रशियन सैन्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
बर्लिनमध्ये ३० हजार जणांनी केले विरोधी आंदोलन
जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिनमध्ये रशियाच्या विरोधात पुन्हा एकदा मोठे आंदोलन झाले आहे. रविवारी ३० हजारांहून जास्त नागरिक हातात युक्रेनचे झेंडे घेवून या आंदोलनात सहभागी झाले होते.