Qatar PM meets Donald Trump 3 days after Israeli attack
Quatar PM America Visit : दोहा : कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी शुक्रवारी (१२ सप्टेंबर) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेतली आहे. ही भेट अशा वेळी होत आहे, जेव्हा तीन दिवसांपूर्वी इस्रायलने कतारची राजधानी दोहावर हल्ला केला होता.
इस्रायलला पुन्हा हल्ला करणार नाही- ट्रम्पचे आश्वासन
शेख मोहम्मद यांच्या दौऱ्यामुळे इस्रायलला मोठा धक्का बसला आहे. हा दौरा अत्यंत महत्वचा मानला जात आहे, मात्र अद्याप या दौऱ्यातील चर्चेवर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे सर्वत्र याचीच चर्चा सुरु आहे. शिवाय या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंना कॉल केला होता.
यावेळी ट्रम्प यांनी इस्रायलच्या हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांनी कतारला आश्वासन इस्रायल पुन्हा हल्ला करणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. पण नेतन्याहूंनी जाहीरपणे कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.
इस्रायलचा तब्बल सहा इस्लामिक देशांवर हल्ला; सुमारे २०० नागरिकांचा मृत्यू, हजारो जखमी
अमेरिकेसाठी कतार महत्त्वाचा का?
मध्यपूर्वेत कतारमध्ये अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ अल उदेद कतारमध्ये आहे, या ठिकाणी
सुमरे १० हजार सैनिक अमेरिकेने तैनात केले आहे. यामुळे कतार अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
शेख यांनी अमेरिकेच्या इतर मंत्र्याचीही घेतली भेट
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह वीटकॉफ ही उपस्थित होते. तसेच या भेटीनंतर शेख यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्याशी ट्रम्पशी भेटपूर्वी चर्चा केली.
या मुद्यांवर झाली चर्चा
FAQs (संबंधित प्रश्न)
कतारच्या पंतप्रधानांनी का दिली अमेरिकेला भेट?
इस्रायल हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांनी अमेरिकेला भेट दिली.
शेख मोहम्मद यांनी अमेरिकेत कोणाकोणाची घेतली भेट?
शेख मोहम्मद यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स, राजूदत स्टीव्ह वीटकॉफ, आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली.